सोलापूर : नामदेवराव (बापू) भालशंकर गौरव समिती आणि मातोश्री रुक्मिणी फाउण्डेशनच्या वतीने आयोजित प्रज्ञावंत, शीलवंत, गुणवंत मान्यवर राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण झाले. तसेच गरीब, वंचित, अनाथ विद्यार्थ्यांना कर्तव्यनिधी (शिष्यवृत्ती) वाटप उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य आप्पासाहेब उबाळे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरू जाधव, प्राचार्य आशितोष शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थान बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी भूषविले.
यावेळी कामगार नेते अशोक जानराव, आशितोष शहा, केरू जाधव यांनी मनोगतातून भालशंकर गौरव पुरस्काराबद्दल गौरवोद्गार काढले. प्रास्ताविक बोधिप्रकाश गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संग्राम कांबळे, प्रा.रूपाली मेश्राम तर आभार डॉ.राजदत्त रासोलगीकर यांनी मांडले.
कार्यक्रमासाठी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे, प्रा. युवराज भोसले, रवि देवकर, विजयकुमार लोंढे, मिलिंद भालशंकर, प्रफुल्ल जानराव, दत्तात्रय शिंदे, अशपाक कंदलगावकर, चंद्रमणी वाघमारे, दाऊद आतार, प्रा. अभिजित भंडारे, रत्नदीप कांबळे, सत्यवान पाचकुडवे, बापूसाहेब अडसूळ, मंजुश्री खंडागळे, अविनाश भालशंकर यांनी परिश्रम घेतले.
----
यांचा झाला गौरव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवन गौरव पुरस्कार- हर्षवदन शहा (सचिव, श्राविका संस्था), नगरसेवक बाबा मिस्त्री, कामगार नेते अशोक जानराव, राजेश डोंगरे (महालक्ष्मी पापड उद्योग समूह ), प्रभाकर गायकवाड (माजी सरपंच, वडाळा), क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक, कर्मचारी पुरस्कार- ज्ञानेश्वर धांडे (मातोश्री माध्यमिक विद्यालय, म्हैसगाव, ता. माढा ), राजू शांतिनाथ देशमाने (जैन गुरुकुल प्रशाला, सोलापूर)
---
फोटो : २७ भालशंकर
नामदेवराव भालशंकर गौरव पुरस्काराचे वितरण करताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे.
समवेत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, शिवदास कांबळे, अप्पासाहेब उबाळे, केरू जाधव, प्राचार्य आशितोष शहा, अण्णासाहेब भालशंकर.