अक्कलकोट : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी परिवारच्यावतीने श्रीशैलम (आंध्र प्रदेश) येथे श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवात एक लाख भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.
सालाबादप्रमाणे यंदाही खेडगी परिवाराच्या सुमारे ६० वर्षाच्या परंपरेला आजही कायम ठेवले आहे. यंदाही गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर श्रीशैल मल्लिकार्जुन देवस्थान येथे सहकुटुंब उपस्थित राहुन १ हजार १०० साधूसंताना वस्त्रदान करून प्रसाद वाटप केले. शिक्षणमहर्षी कै. चनबसप्पा खेडगी यानी सुरु केलेली ही परंपरा अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी चे चेअरमन शिवशरण खेडगी, नगराध्यक्षा शोभाताई खेडगी आणि चिरंजीव माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी व नातवंडांनी देखील जपली. कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी, पवित्रा खेडगी, वैशाली कलशेट्टी, आकाश कलशेट्टी, चन्नवीर खेडगी, मल्लिनाथ भासगी, हणमंत कोळी, सुधीर राठोड, सुरेश पेडसंगी, रावसाहेब खेडगी यांनी परिश्रम घेतले.
----
फोटो : २० अक्कलकोट १
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शिवशरण खेडगी परिवारच्यावतीने श्रीशैल मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवात एक लाख भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, बसलिंगप्पा खेडगी