जयसिंग भोसले यांना पीएच.डी
वैराग : डॉ.जयसिंग बबनराव भोसले यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून अडॉप्शन ऑफ सोशल नेटवर्क मार्केटिंग विषयातून पीएच.डी प्रदान करण्यात आली. ते सध्या सिम्बॉयसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पुणे सेंटरमध्ये अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. स्वातंत्र्यसेनानी सोपानराजे भोसले यांचे ते नातू आहेत.
जागर आंदोलनाचा दिला इशारा
करमाळा : आघाडी सरकारच्या वतीने पुन्हा एकदा वीज तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. साखर कारखान्यांकडून उसाची बिले अद्याप मिळालेली नाहीत. त्यामुळे वीजबिल आदेश रद्द करावा, अन्यथा जागर आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. या मागणीबाबतचे निवेदन तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक महादेवक फंड, दीपक चव्हाण, शशीकांत पवार, अमरजीत साळुंखे, जगदीश अगरवाल, लक्ष्मण केकान, अर्जुन गाडे, अंगद देवकते, नरेंद्र ठाकूर, अमोल पवार, जितेश कटारिया, मयूर देवी, संतोष कांबळे उपस्थित होते.
वेशीच्या बांधकामासाठी दिली मदत
टेंभुर्णी : येथील देशमुख आणि कंपनीचे चेअरमन बाळासाहेब लक्ष्मण देशमुख यांनी टेंभुर्णी शहरातील अकलूज रस्त्यावर पुरातन वेशीच्या बांधकामासाठी रोख एक लाखाची मदत इंदापूर बचाव समितीकडे दिली. यावेळी भाजप माढा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, भाऊसाहेब महाडिक, गोरख खटके, विलास देशमुख, जयवंत पोळ, गौतम खटके, विलास कोठावळे, हर्षवर्धन देशमुख, सुधीर पाटील, मयूर काळे, प्रशांत देशमुख, भाऊ देशमुख, अप्पासहेब हवालदार, बाळासाहेब पवार, मृणाल देशमुख उपस्थित होते.
जनहितच्या शाखेचे सिद्धेवाडीत उद्घाटन
मोहाेळ : सिद्धेवाडी येथे प्रभाकर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थित व सरपंच मोहन माने यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या शाखेचे उद्घाटन झाले. यावेळी उपसरपंच दाजी शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, नानासाहेब मोरे, महादेव माने, साहेबराव निकम, संयोजक जगन्नाथ माने, सर्जेराव चव्हाण, शाखाध्यक्ष रोहित माने, उपाध्यक्ष राजू माने, सचिव गणेश माने, रमेश माने, पंढरीनाथ डोंगरे, सचिन भांगे, महेश माने, आबा दाढे, नितीन जरग उपस्थित होते.
करमाळ्यात मास्कचे वाटप
करमाळा : रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते मास्कचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ.शरद शिर्के, संत दामाजी नगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सतीश मोहिते, दिलीप उघाडे, बबलू सुतार, माजी नगरसेवक खंडू खंदारे, आनंद मुढे, पांडुरंग नकाते, दिगंबर यादव, स्वप्निल टेकाळे, संजय माळी, ओम शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी साडेसात हजार मास्कचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाबाबत अनेकांनी कौतुक केले.