बार्शी : भारत विकास परिषद बार्शी शाखेच्या वतीने निबंध स्पर्धेत यशवंतांना आणि निवडक मान्यवरांना सेवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना नीलिमा सरवदे व शिल्पा सरवदे यांच्या हस्ते सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार बार्शीतील ऋषभदेव जैन मानवसेवा संस्थेला देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच रचना राहुल काळे (डान्स स्पर्धा), साची वाडकर (कमर्शियल पायलट) आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनिल काळे व वंदना कुलकर्णी यांचाही सत्कार करण्यात आला.
निबंध स्पर्धेतील यशाबद्दल सुचिता शंकर बारकुल (प्रथम), दीपाली भास्कर गोरे (द्वितीय), हिरा दिगंबर देवकर (उत्तेजनार्थ), मेघा काळे, शुभांगी घळके, रजनी जयसिंह पाटील, शोभा पाटील, शिल्पा फल्ले यांना देण्यात आले. याप्रसंगी अनंत कवठाळे, पंडित मिरगणे, कृष्णराज बारबोले, मधुरा बाजारें यांनी मनोगत तर शिल्पा सरवदे यांनीही प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी सुभाष जगदाळे, संतोष जोशी, सुहास देशमुख, वंदना जगदाळे, संदीप नागणे यांनी परिश्रम घेतले.
-----
यांचा झाला गौरव
प्रभावती नरहरी अलाट (आदर्श माता पुरस्कार), निर्मला पांडुरंग देशपांडे (सेवा पुरस्कार), पूर्वा प्रवीण वैद्य (बचत गट) , माधवी प्रसाद कुलकर्णी (योग शिक्षक), विनया महेश निंबाळकर (समाजीक सेवा), सई पवन गुंड (वैद्यकीय), माधुरी बाजारे (वैद्यकीयआयुर्वेद), कृष्णराज बारबोले (राजकीय), सुधाकर विष्णू मिरगणे (राजकीय), हर्षवर्धन चंदूलाल शहा (वैद्यकीय), अरुण बळप (पत्रकार), कृष्णा ऊर्फ राजेश वानखेडे (छायाचित्रकार), प्रभुलिंग स्वामी (सेवा पुरस्कार).