शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती

By admin | Published: June 30, 2017 6:40 PM

आॅनलाइन लोकमत सोलापूर

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि. ३० :- पंढरपुरात आषाढी वारीचा सोहळा ४ जुलै २०१७ रोजी होत आहे. आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आषाढी वारीसाठी येणाऱ्या पालख्यांना मुक्कामाच्या ठिकाणी आणि वारकरी-भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा देण्यास प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.आषाढी वारीच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी भोसले पंढरपुरात मुक्कामी आहेत. वारकरी आणि भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना कार्यरत केले आहे. डॉ. भोसले म्हणाले, यंदाच्या आषाढी वारीत वारकरी केंद्रबिंदू मानून आवश्यक सेवा सुविधा देण्यास प्रशासन आणि मंदिर समितीने प्राधान्य दिले आहे. मंदिर समितीमार्फत दर्शन रांगेसाठी तात्पुरती पत्राशेड उभारण्यात आली आहे. या ठिकाणी 80 हजार भाविकांची सोय होणार आहे. दर्शन मंडपात हवा खेळती रहावी यासाठी नवीन पंखे आणि इतर सुरक्षेची कार्यवाही करण्यात आली आहे.वारी कालावधीत स्वच्छता व आरोग्य सुविधेला प्राधान्य दिले असून मंदिर परिसर, दर्शन मंडप, पंढरपूर शहरात याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. पंढरपुरात येणाऱ्या वारकरी भाविकाला अधिकच्या सुविधा मिळाव्यात. आषाढीवारीसाठी येणारे भाविक-वारकरी केंद्रबिंदू मानून त्यांना सुविधा देण्यास प्रशासन सज्ज आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही, याची खबरदारी प्रशासनामार्फत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.६५ एकर येथे वारकऱ्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली असून या ठिकाणी हायमास्ट प्रकाश योजना , २४ तास पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा आणि आपत्ती प्रतिसाद व मदत केंद्रे कार्यान्वित करण्यात आले आहे. ६५ एकर, पालखी मुक्काम, वाळवंटामध्ये पुरेशी शौचालये उपलब्ध करुन देण्यात आली, असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलीसांच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्तासाठी शेजारील जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.