सेवा सोसायटींकडून पीककर्ज मिळते; परंतु आता डीसीसी बँकेनेही यात पुढाकार घेतला आहे. थेट अल्पमुदत पीककर्ज योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मॉरगेज केल्यानंतर १ लाख ६० हजार ते ३ लाखांपर्यंत ७ टक्के, ३ ते ५ लाखांपर्यंतचे कर्ज १० टक्के व्याज दराने मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी जर वर्षभरात या कर्जाची परतफेड केली, तर ४ टक्के व्याज हे शासन भरणार असून, इतरही काही सवलती दिल्या जाणार आहेत. यासाठी प्रोसेसिंग फी कमीत कमी लागणार असून, कोणताही शेअर्स कपात होणार नाही, तर जामीनदार न लागता केवळ केसीसीद्वारे कर्ज मिळणार आहे. बँकेच्या त्या-त्या शाखेत अर्ज केल्यानंतर सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ८ दिवसांच्या आता हे कर्ज दिले जाणार आहे. या कर्जासाठी अत्यंत कमी प्रमाणात कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत, असे मिलिंद देशपांडे यांनी सांगितले.
भाळवणी शाखेतून केली सुरुवात
भाळवणी (ता. पंढरपूर) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत या योजनेअंतर्गत कर्ज वाटपाला सुरुवात करण्यात आली. येथील एका शेतकऱ्याला २ लाख ८७ हजार, तर दुसऱ्या शेतकऱ्याला दोन लाख ५९ हजार रुपये कर्ज देण्यात आले. याप्रसंगी पंढरपूर तालुका वरिष्ठ बँक निरीक्षक मिलिंद देशपांडे, भाळवणी शाखा बँक निरीक्षक एस. एस. लोखंडे, शाखाधिकारी थोरात, भाळवणी सोसायटी सचिव जयंत शिंदे, उपरीचे सचिव व्ही. ए. शेडबाळे, केसकरवाडीचे सचिव धुळदेव शेंडगे, रामदास नागटिळक, चंद्रकांत सातपुते व लाभधारक शेतकरी उपस्थित होते.
कोट ::::::::::::::::::::::::
सर्व शाखांमध्ये ही योजना सुरू केली आहे.
पंढरपूर तालुक्यात डीसीसी बँकेच्या एकूण १७ शाखा असून, जेवढे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करतील, त्या सर्वांना कागदपत्रांची तपासणी करून आठ दिवसांच्या आत थेट अल्पमुदत पीक कर्ज योजनेअंतर्गत कर्ज दिले जाणार आहे.
- मिलिंद देशपांडे
वरिष्ठ बँक निरीक्षक, पंढरपूर
फोटो लाईन ::::::::::
डीसीसी बँकेतर्फे कर्ज वाटपाचा प्रारंभ करताना वरिष्ठ बँक निरीक्षक मिलिंद देशपांडे. यावेळी शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.