करमाळा तालुक्यातील वांगी - ३ येथील शेतकरी मेळाव्यात थेट अल्पमुदत कर्ज या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी करमाळ्याचे सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे होते.
यावेळी आदिनाथचे माजी व्हाईस चेअरमन शहाजीराव देशमुख, पंचायत समितीचे माजी सदस्य रोहिदास सातव, वांगी सोसायटीचे माजी चेअरमन रोकडे, सिनियर बँक इन्सपेक्टर अण्णासाहेब आवटे, पालक अधिकारी जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील ज्या ज्या बॅंकांनी पीककर्ज देण्याचे बंद केले त्यापैकी जिल्हा बॅंक सोडल्यास कोणत्याही बॅंकेने कर्ज वाटप चालू केले नाही. जिल्हा बॅंकेनेच थेट अल्पमुदत कर्ज योजना चालू केली असून, जिल्हा बॅंकेने व्यावसायिक कर्ज सोनेतारण कर्ज, नोकरदाराना कर्ज, वाहन कर्ज, मायक्रो एटीएम, आदी योजना चालू केल्याने बॅंकेची विश्वासार्हता वाढून बॅंकेच्या ठेवीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक पालक अधिकारी जयंत पाटील यांनी केले. आभार आण्णासाहेब आवटे यांनी मानले. यावेळी वांगी नंबर ३ येथील मयूर रोकडे यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २० लाख रुपये व्यवसाय कर्ज मंजुरीचे पत्र बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांच्या देण्यात आले.
या प्रसंगी परिसरातील उद्योजक व बँकेचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
वांगी नं.३ येथे जिल्हा बंँकेच्या मेळाव्यात बोलताना प्रशासक शैलेश कोतमिरे व बँक अधिकारी.