सोलापूर :
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून या भेटीत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका बंद पडणार आहेत का?, याबाबत विचारणा केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका बंद पडणार नाहीत किंवा तसे कोणतेही निर्णय मी घेणार नाही, अशी ग्वाही शहा यांनी दिल्याची माहिती माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोलापुरात दिली.
पाटील हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर होते. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इंदापुरातील लाकडी- निंबोडी या वादग्रस्त पाणीपुरवठा योजनेवरही ते बोलले. ते म्हणाले, ही योजना २०१२ सालीच ही मंजूर आहे. पाणी वाटपाची प्रक्रिया देखील त्यावेळीच ठरली होती. अलीकडच्या काळात याचे श्रेय काहीजण घेत आहेत, असे बोलत इंदापूरचे माजी मंत्री तथा सोलापूरचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या टीका केली.