शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

इंग्रजी शाळांना मागे टाकणारी कारंब्याची जिल्हा परिषद शाळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 10:33 AM

सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशील शाळा; पहिलीतली मुलं वाचतात सफाईदारपणे जोडाक्षरं

ठळक मुद्देएकाग्रतेसाठी ‘मित्रा’ उपक्रम ठरतोय परिणामकारक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर भरग्रामपंचायतीच्या माध्यमातून केली जाते मदत

विलास जळकोटकर

सोलापूर :  बार्शी रोडवर शहरापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असणारी जिल्हा परिषदेची कारंबा प्राथमिक शाळा...इंग्रजीशाळांनाही मागे टाकणारी. इथली पहिलीत  शिकणारी मुलं १९  खडी अध्यापन पद्धतीच्या आधारे अवघड असे जोडशब्दही सफाईदार वाचतात. 

शैक्षणिक अध्यापनाबरोबरच अन्य सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणारी शाळा म्हणून उल्लेख करावा लागेल. शाळेत प्रवेश करताच आकर्षक रंगरंगोटी. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला पूरक अशा बोलक्या भिंती खूप काही सांगून जातात. शालेय बाग, वर्गखोल्यापुढील झाडे, रंगरंगोटी, वॉल कंपाऊंड, खेळण्यासाठी प्रशस्त मैदान असा एकंदरीत शाळेचा परिसर भौतिक सुविधायुक्त असल्याचा पाहायला मिळाला. 

‘स्मार्ट गर्ल स्मार्ट बॉय’, ‘जो दिनांक तो पहा’ विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षकांचे अभीष्टचिंतन, वेगवेगळे सण-उत्सव साजरे करुन मुलांमध्ये पारंपरिक ज्ञान दिले जाते. वनभोजन, शैक्षणिक सहल, बाल आनंद मेळावा अशा उपक्रमातून बाह्यजगाची ओळख, व्यवहारज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास वर्गामध्ये लॉकर असलेल्या कपाटाची सोय दिसून आली. वाचन-लेखनाबरोबरच गणिती क्रिया इथली मुले अचूकपणे करतात. त्यामुळे यावर्षी या शाळेचा पटही लक्षणीय दिसून येतो. विद्यार्थ्यांना केवळ शिकवण्याचे नाही तर घडवण्याचे काम मुख्याध्यापिका सुमन जानराव, शिक्षक प्रवीण घोडके, सोमनाथ मिसाळ, सुनंदा काळे, संगीता गायकवाड, लता सूर्यवंशी,  मंदाकिनी शिंदे  हे गुरुजी श्रम घेत असल्याचं पाहायला मिळालं.

संगीत शिक्षणाचे धडेमुलांना शिक्षणाचे धडे देत असताना टँलेंट हंट स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना कला क्षेत्राबद्दलही गोडी लागावी, त्यातील ज्ञान समृद्ध होण्यासाठी तबला वादन, संगीत पेटी वादन तसेच नृत्यामध्ये बीटस्तरावर प्रथम क्रमांक मिळवले आहेत. मुलं चौफेर घडवण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केला जातोय.

क्रिडा स्पर्धेतही यशगुणवत्तेच्या बाबतीत मुलं चौफेर व्हावी यासाठी इयत्ता १ लीची मुले १९  खडी अध्यापन पद्धतीच्या उपक्रमातून अवघड असे जोडशब्दही फाडफाड वाचत असल्याचा प्रत्यय आला. इंग्रजी वाचनही इथली मुले सफाईदारपणे करतात. क्रीडा स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यांनी कबड्डीमध्ये तालुका स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व बौद्धिक विकासासाठी आमचा प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांचे लक्ष एकाग्रतेसाठी इथे ‘मित्रा’ उपक्रम राबवला जातो. डिजिटल ई-लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकवल्या जातात.- सुमन जानराव, मुख्याध्यापक 

शाळा मुलांना खूप आवडीची वाटते. त्यांच्यातील बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. जोडाक्षरे आणि इंग्रजी विषयाचे बेसिक ज्ञान देताना मुलांच्या मानसिकतेनुसार आनंददायी शिक्षणपद्धती राबवली जाते. त्यांच्यातील बदल स्वागतार्ह आहे. - रेखा शिंदे, पालक

लोकसहभाग मोलाचाशाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांचाही सहभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरतो. लोकसहभागातून शाळेला घसरगुंडी, झोका साहित्य प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुले बागेत खेळण्याचा आनंद घेतात.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षणenglishइंग्रजी