सोलापूर:२६ फेब्रुवारी ते ७ जूनपर्यंत सोलापूर जिल्ह्यात वादळीवारे, विजा पडल्याने मोठी प्राणहानी झाली आहे. या दरम्यान २० नागरिक, लहान-मोठ्या ३६२ जनावरांचा मृत्यू झाला असून, १० हजार ३९३ घरांची पडझड झाली आहे. अवकाळी पाऊस यंदा अधिकच नुकसानीचा ठरला आहे.सोलापूर जिल्ह्यात आजवर जून ते सप्टेंबर दरम्यान पाऊस पडतो. मार्च ते मे दरम्यान कधी तरी अवकाळी पाऊस पडतो परंतु त्याचे वातावरण एक-दोन दिवसाचे असायचे. ढगाळ हवामान एक-दोन दिवस राहिले जात असल्याचा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे. यंदा मात्र निसर्गाने कहरच केला आहे. २६ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात वादळ, विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झाला. गुरुवार, ६ मे रोजी तसेच शुक्रवारीही सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात नुकसानीकारक पाऊस झाला. या दोन दिवसांत चौघांचा जीव गेला. २६ फेब्रुवारी ते ७ मे या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने, झाड पडल्याने, घरांवरील पत्रे पडल्याने, भिंत पडल्याने २० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. २५६ मोठी तर १०६ लहान जनावरेही यात दगावली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. सततच्या वादळ व पावसाने १० हजार ३९३ घरांची पडझड झाली आहे. -----------------------------पक्ष्यांचीही झाली हानीलहान जनावरांत शेळ्या-मेंढ्यांचा समावेश आहे. कोंबड्या व अन्य पक्ष्यांचा समावेश यात नाही. यांच्या मृत्यूची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात नाही. परंतु जिल्ह्यात अशा लहान पक्ष्यांचीही मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
जिल्ह्यात २० बळी
By admin | Published: June 10, 2014 12:35 AM