सोलापूर : राज्य शासनाने हाती घेतलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाच्या कामाचे स्वरूप ठरवून आठ भागात विभागणी के ली आहे. तसेच तत्काळ उपाययोजनांच्या पूर्ततेसाठी यंत्रणेला ३१ आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा परिषद आणि महसूल विभागाच्या नियमित आढाव्यासाठी डॉ. म्हैसेकर येथे आले होते. अधिकाºयांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत नमामि चंद्रभागा अभियानासंदर्भात ते म्हणाले, या मोहिमेचे स्वरूप व्यापक आहे. भीमाशंकर ते चंद्रभागा असा हा अभियानाचा प्रवास असून २०२२ पर्यंत कालबद्ध कार्यक्रम सरकारने आखला आहे.
त्या दृष्टीने कामाचे नियोजन सुरू आहे. नदीचा आराखडा तयार करून कामाचे नियोजन आखले जात आहे. पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांशी संबंधित हे अभियान असून पाच नगरपालिका आणि दोन महानगरपालिकांमधील घनकचरा नियोजनाचे कामही या अंतर्गत आखण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महानगरपालिकांना त्यासंदर्भात निर्देशही देण्यात आले आहेत. विविध प्रकल्प आणि नदीकाठावरील साखर कारखान्यांकडून नदीमध्ये सोडल्या जाणाºया सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पंढरपूर ते उजनी, उजनी ते पुणे आणि पुणे ते भीमाशंकर अशा तीन टप्प्यात चंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी काम केले जाणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील अखर्चित निधी परत जाण्याच्या प्रकरणी अहवाल मागविला असून त्रुटी आढळलेल्या अधिकाºयांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. संबंधितांना ३१ जुलैपर्यंत कालावधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. सोलापूर जिल्हा परिषदेचे कामकाज चांगले चालले असून राज्य स्तरावर नोंद घेण्यासारखे काम येथे झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एका उत्तरादरम्यान व्यक्त केली.
आषाढी वारी २०१८ अॅपच्वारकºयांच्या सुविधेसाठी यंदा प्रथमच ‘आषाढी वारी-२०१८’ हा अॅप तयार करण्यात आला आहे. यात वारीला येणाºया मुख्य पालख्यांचे मार्ग, वेळापत्रक, वैद्यकीय सुविधा, महत्त्वाचे क्रमांक या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्ले स्टोअरवरून वारकरी हा अॅप आपल्या मोबाईलमध्ये नि:शुल्क डाऊनलोड करू शकतात. यापूर्वी पुणे जिल्ह्यापुरता हा अॅप मर्यादित होता. त्याला व्यापक करून पुण्यासह सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील वारीसंदर्भातील माहितीचा समावेश यात करण्यात आला आहे.