पन्नास मीटर बटरफ्लाय व २०० मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात भाग घेणार आहे. ही स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर जकार्ता येथे २०१८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये एशियन गेममध्ये त्याने स्पर्धेसाठी असलेली पात्रता पूर्ण केली आहे. या स्पर्धेत त्याने ५० मीटर बटरफ्लाय शर्यत ३२.७१ सेकंदांमध्ये पूर्ण करीत सुवर्णपदक पटकावले होते.
२०० मीटर वैयक्तिक मिडले या प्रकारात त्याने कांस्यपदक जिंकले होते. हे अंतर त्याने दोन मिनिटे ५६.५१ सेकंदांत पूर्ण केले होते.
त्याच्या कामगिरीवर महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती, तर केंद्र शासनाने अर्जुन क्रीडा पुरस्काराने गौरविले आहे. तसेच राज्य शासनाने पुणे येथे जलतरण प्रशिक्षक म्हणून प्रथम श्रेणीची नोकरी दिली आहे. सध्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविल्याने करमाळा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.