सोलापूर : शहरातील घरफोड्या, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी व मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून संबंधित फिर्यादीचा ३0 लाख ३३ हजारांचा मुद्देमाल पोलीस आयुक्तालयाच्या वतीने परत करण्यात आला. पोलिसांच्या कामगिरीमुळे कुलूप तोडून घर फोडलेल्यांच्या घरी आता खºया अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या सहा महिन्यांत घरफोडी, मोटरसायकल चोरी, मोबाईल चोरी, चेन स्नॅचिंग आदी विविध प्रकारचे ६५ गुन्हे सात पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. तपासात १0 लाख ८४ हजार २२0 रूपयांचे सोन्याचे दागिने, १ लाख रूपये किमतीचे ८ मोबाईल हँडसेट, १0 लाख ९४ हजार रूपये किमतीच्या ३८ मोटरसायकली, ५२ हजार २२0 रोख रक्कम, १५ हजार रूपये किमतीचा एक एलईडी टीव्ही, ५0 हजार रूपये किमतीची एक कार, १५ हजार रूपये किमतीचे तीन संगणक, २३ हजार ५00 रूपये किमतीचे ५५0 ब्लाऊज पीस नग, ६0 हजार रूपये किमतीचा एक मालट्रक असा एकूण ३0 लाख ३३ हजार ९४0 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हा सर्व मुद्देमाल रितसर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादीस परत करण्यात आला.
पोलीस आयुक्तालयात पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते मुद्देमालाचे वितरण करण्यात आले. यावेळी मंचावर पोलीस उपायुक्त मधुकर गायकवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा बापूसाहेब बांगर, सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त डॉ.दीपाली काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी केले तर आभार सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक फौजदार जयंत चवरे, पोहेकॉ बाबर कोतवाल, सूरज मुलाणी, औदुंबर आटोळे, पोना सुभाष पवार, जयसिंग भोई, मंजुनाथ मुत्तनवार, मंगेश भुसारे, पो.कॉ. सनी राठोड, मुद्देमाल कारकून शंकर सरवदे, मोईन मुजावर, विजय नाईकनवरे, सुहास बनसोडे, सुरेश माळी, मालन नाकेदार, शशिकांत दराडे यांनी परिश्रम घेतले.
दागिने घेताना भारावल्या महिला...- घरफोडी झाल्यानंतर हताश झालेल्या कुटुंबातील महिलांना दागिने परत मिळतील याची शाश्वती नव्हती. पै पै जमा करून घेतलेले दागिने अचानक चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकारामुळे निराश झालेल्या कुटुंबातील महिलांच्या हाती जेव्हा पुन्हा त्यांचे दागिने पडले तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता. माझे दागिने परत मला मिळाले या आनंदात एका महिलेने आनंदाश्रू गाळले.