काँग्रेस-राकाँ; दक्षिण तालुक्याचे जिल्हाधिकार्यांना निवेदनसोलापूर: गारपीट नुकसानीचे मुदतीनंतरचे अर्ज स्वीकारून फेरपंचनामे करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्यांना देण्यात आले आहे.फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले नसल्याची त्यांची तक्रार आहे. गुंजेगाव, विंचूर, कंदलगाव, कारकल, मनगोळी, कुंभारी, कर्देहळ्ळी, बरुर या गावातील पंचनामे झाले नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी कर्मचार्यांनी स्वत: पंचनामे न करता दुसर्यावर सोपवून दिले. शेतकर्यांनी कर्मचार्यांशी संपर्क साधल्यानंतरही गावातील 50 टक्के शेतकर्यांचे पंचनामेच झाले नाहीत. तहसीलदार, प्रांताधिकार्यांना भेटल्यानंतरही मार्ग निघाला नसल्याचे जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जि. प. सदस्य उमाकांत राठोड, राकाँचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले, संतोष पवार, अशोक करजोळे, चंद्रशेखर भरले, सुभाष पवार व अन्य पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
गारपीट नुकसानीचे पंचनामे करा
By admin | Published: May 03, 2014 1:23 PM