येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडे एकूण ७१२ शेतकऱ्यांनी मका हमीभावसाठी नोंदणी केली होती. त्यानुसार मका हमीभाव केंद्र सुरू झाल्यानंतर १३५ शेतकऱ्यांची मका खरेदी करून मका हमीभाव केंद्र बंद केले असल्याची उत्तरे येथून दिली जात आहेत. सर्व शेतकऱ्यांची मका खरेदी झाल्याशिवाय मका हमीभाव केंद्र बंद करू नये. उर्वरित शेतकऱ्यांची मकाही त्यांंनी खरेदी करावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर प्रकाश चोपडे, अमोल कुलकर्णी, सुशील गाडेकर, संभाजी उबाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
फोटो ओळ
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील मका हमीभाव केंद्र बंद करू नये यासाठी उपविभागीय अधिकारी जोती कदम यांना निवेदन देताना प्रकाश चोपडे, अमोल कुलकर्णी, सुशील गाडेकर, संभाजी उबाळे आदी.
===Photopath===
211220\21sol_2_21122020_4.jpg
===Caption===
कुर्डूवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील मका हमीभाव केंद्र बंद करू नये यासाठी उपविभागीय अधिकारी जोती कदम यांना निवेदन देताना प्रकाश चोपडे,अमोल कुलकर्णी,सुशील गाडेकर,संभाजी उबाळे आदी.