तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्ठमंडळाने ही मागणी केली. ग्रामपंचायत निवडणूक ही लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीपेक्षा वेगळी असते. वार्डनिहाय मतदानप्रक्रिया असल्यामुळे एखाद्या वार्डात एक किंवा दोनच कर्मचारी मतदार असतात. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकालही कमी मतांच्या फरकांनी लागतात. विजयी उमेदवार व पराभूत उमेदवार यांच्यातील मतांचा फरक अल्प असतो.
पोस्टल बॅलेटचे मतदान स्वतंत्ररित्या मोजल्यामुळे सदर कर्मचाऱ्याने कोणत्या उमेदवाराला मत दिले, हे समजत असल्यामुळे कमी मतांनी पराभूत होणाऱ्या उमेदवाराच्या रोषाला कर्मचारी नाहक बळी जातो. सर्व कर्मचाऱ्यांचे मतदान मोजून पोस्टल बॅलेटची स्वतंत्र आकडेवारी जाहीर न करता ती आकडेवारी मतदानयंत्रांच्या मतांमध्ये धरून एकत्रितपणे जाहीर करावी, अशी मागणी केली आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष सिद्धाराम बिराजदार, सरचिटणीस होन्नपा बुळळा,कन्नड विभाग जिल्हाध्यक्ष बसवराज गुरव,संतोष दांगट आणि दयानंद चव्हाण उपस्थित होते.