सोलापूर : पालकांकडून सातत्याने मुलांना ‘स्वप्न बघा’ असे सांगितले जाते़ स्वप्न बघू नका, ती पूर्ण होत नाहीत़ ध्येय बघा़, ते पूर्ण होईल, असे आवाहन सुपर अॅचिव्हर विवेक मेहेत्रे यांनी केले़ लोकमत युवा नेक्स्ट आयोजित ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर २०१४’ मध्ये पहिल्या दिवशी ‘चला यशस्वी होऊ या’ या विषयावर मेहेत्रे यांचे व्याख्यान पार पडले़ यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांनी वरील आवाहन केले़ युवकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी ९१० वेळा स्फूर्ती निर्माण करणारे आणि १६ वर्षे सह्याद्री वाहिनीवर तज्ज्ञांच्या मुलाखती घेणारे मेहेत्रे यांनी माणसांमध्ये दडलेली निराशा, प्रत्येकाला मिळालेली बुद्धिमत्ता, तिचा वापर करुन कसा विकास साधू शकतो, अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत व्याख्यानातून स्फूर्ती दिली़ आलेल्या संकटावर मात करीत जीवनात यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या स्लाईड शोद्वारे माहिती देऊन त्यांनी युवकांमधील स्फुलिंग चेतावले.ते म्हणाले की, जीवनात लहानापासूनच ‘नाही’ हा शब्द शिकविला जातो. यामुळे मुलं १७ वर्षांची झाली तरी नाही म्हणत निराश होताना दिसून येतात. त्यामुळे जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ‘नाही’ हा शब्द फेकून द्या. आलेली संकटे झेला. आपल्याला काय व्हायचे आहे, याचा विचार करुन झेप घ्या, असे सांगून जीवनात यशस्वी होण्याचे १३ नियम त्यांनी विशद केले.यानंतर मेहेत्रे यांना विद्यार्थी, पालकांनी प्रश्न विचारुन यशाची गुपिते जाणून घेतली़ तब्बल १ तास १० मिनिटे मेहेत्रे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करुन खुर्चीला खिळवून टाकले. -----------------------------------विवेक मेहेत्रे म्हणाले...वयाची ४०-४५ शी गाठलेली व्यक्ती नोकरीचा राजीनामा देतो म्हणतोय़ माणसं खचून चालली आहेत़दुसर्याची रेषा बारीक करुन स्वत:ची रेषा मोठी करू शकत नाही़इथली मुलं आत्मविश्वास हरवली आहेत, परिणामत: बाहेरच्या राज्यातील अल्पशिक्षित मुलं महाराष्ट्रात भवितव्य घडवित आहेत़केवळ पुस्तक वाचून यशस्वी होता येत नाही़ या जगात यशाचे नियम आहेत़ नवे बदल स्वीकारा, ‘नाही’ हा शब्द आपल्या मानसिकतेतून काढून टाकापैसा मिळविणे वाईट नाही, पण चांगल्या मार्गाने कमवा़कोणतेही यश हे समाज, जात, पार्श्वभूमी आणि पैशावर लाभत नाही़ प्रयत्नांचीच गरज आहे़ प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द, आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करता येते़आयुष्यात फालतुगिरी आणि फालतुगिरी करणार्या माणसांपासून दूर राहिल्यास पुढे जाल़ मनातला नकारार्थी शब्द काढून टाका़
स्वप्न बघू नका, ध्येय बघा: मेहेत्रे
By admin | Published: June 06, 2014 1:14 AM