आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, पण एकही लढाई ते हरले नाहीत़ ते ४० वर्षे जगले़ वयाच्या २० व्या वर्षी ते सत्तेत आले़ २० वर्षांची पेशवाई कारकीर्द ही देदीप्यमान होती. परंतु आज बाजीराव म्हटले की, मस्तानीचे प्रेमवीर या संकुचित वृत्तीने पाहिले जाते़ मस्तानी आणि बाजीराव यांचा सहवास केवळ दीड वर्षांचा होता़ परंतु या गोष्टीला महत्त्व देऊन त्यांची कारकीर्द झाकोळली जात असल्याची खंत अहमदनगरचे इतिहास अभ्यासक विक्रम एडके यांनी व्यक्त केली़मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात शिवछत्रपती व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले़ या व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प विक्रम एडके यांनी ‘थोरले बाजीराव आणि मराठ्यांची युद्धनीती’ या विषयावर गुंफले़ गुरुवारी सायंकाळी पार पडलेल्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, माजी महापौर मनोहर सपाटे यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रास्ताविक महेश माने यांनी केले़ अध्यक्षीय मनोगतातून मनोहर सपाटे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा मांडला़ विक्रम एडके पुढे म्हणाले, माणूस जसा अस्मितेच्या जोरावर जगत असतो तसा देशही अस्मितेच्या जोरावर चालत असतो़ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशातील लोकांची अस्मिता जागृत करून स्वराज्य निर्माण केले़ इंग्रजांनी आपली अस्मिता हिरावून घेऊन १५० वर्षे राज्य केले़ विखारी प्रचार करून आपले महापुरुष जाती-पंथामध्ये विभागले़ सूत्रसंचालन प्रा़ शेफाली विभुते यांनी केले तर आभार अॅड़ सुभाष साळुंखे यांनी मानले़ यावेळी माऊली पवार, प्रा़ महेश माने, विनायकराव पाटील, निवृत्ती केत, हणमंतू बेसुळके, शहाजी सुर्वे, मोहन गोरे, चिंतामणी सपाटे, सुरेश पवार, दत्ता भोसले, उषा लोखंडे, विजया पाटील, अनिल लोंढे, गगन अंकुशे उपस्थित होते़ ------------------------शिवतीर्थ सुशोभीकरणाने वेधले लक्ष४छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोस्टर्स माध्यमातून साकारलेल्या शिवतीर्थच्या सुशोभीकरणाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते झाले़ तसेच पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली़ यावेळी जिल्हाधिकारी भोसले यांनी संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमातून नव्या पिढीला चांगला आदर्श मिळेल, असे म्हणाले़ यानंतर पोलीस आयुक्त तांबडे यांनी व्याख्यानमालेस शुभेच्छा देत एऩसी़सी़ छात्रांनी केलेल्या संचलनाचे कौतुक केले़
केवळ मस्तानीचे प्रेमवीर म्हणून बाजीरावांकडे पाहू नका, विक्रम एडके यांची माहिती, शिवछत्रपती व्याख्यानमालेचे सोलापूरात उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:29 PM
बाजीराव पेशव्यांनी स्वत:च्या आयुष्यात अनेक लढाया लढल्या, पण एकही लढाई ते हरले नाहीत़ ते ४० वर्षे जगले़ वयाच्या २० व्या वर्षी ते सत्तेत आले़ २० वर्षांची पेशवाई कारकीर्द ही देदीप्यमान होती
ठळक मुद्देमराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी शिक्षण संकुलाच्या प्रांगणात शिवछत्रपती व्याख्यानमालेचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले़ या व्याख्यानमालेचे पहिलेच पुष्प विक्रम एडके यांनी ‘थोरले बाजीराव आणि मराठ्यांची युद्धनीती’ या विषयावर गुंफले़ माणूस जसा अस्मितेच्या जोरावर जगत असतो तसा देशही अस्मितेच्या जोरावर चालत असतो़ छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या देशातील लोकांची अस्मिता जागृत करून स्वराज्य निर्माण केले़ : विक्रम एडके