आप्पासाहेब पाटील
सोलापूर : वार मंगळवाऱ़़ वेळ सकाळी ११ वाजताची... स्थळ सोलापूरचेरेल्वे स्टेशऩ़़ निमित्त होते अश्विनी रुग्णालयाच्या वतीने स्थापन केलेल्या प्रथमोपचार केंद्राच्या उद्घाटनाचे... मान्यवर कार्यक्रमस्थळी दाखल़़. उद्घाटन कार्यक्रमाला सरुवात... एवढ्यातच रेल्वे स्थानकावरील कार्यालयातील टेलिफोनची रिंग वाजते...
फोन उचलताच तिकडून आवाज येऊ लागतो...हॅलो..हॅलो..मी आहुजा बोलतोय...मी सध्या उद्यान एक्स्प्रेसमधून प्रवास करीत आहे़..ग़ाडी सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ आली आहे..माझ्या मावशीची तब्येत बिघडली आहे़़क़ृपा करून डॉक्टरांना पाठवाल का ?...हे ऐकताच तातडीने रेल्वे अधिकाºयांनी रेल्वे हॉस्पिटलला कळविले..शिवाय रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या अश्विनी हॉस्पिटलच्या प्रथमोपचार केंद्रातील टीमलाही कळविले.. लागलीच तेथे उपस्थित असलेल्या प्रथमोपचार केंद्रातील डॉक्टरांच्या टीमने उद्घाटनाचा कार्यक्रम सोडून फलाट क्रमांक ३ गाठले..क़ाही वेळातच उद्यान एक्स्प्रेस फलाटावर येताच डॉक्टरांच्या टीमने पेशंट कोणत्या डब्यात आहे, हे शोधण्यास सुरूवात केली़़़एवढ्यात डॉक्टरांची टीम पाहून वातानुकूलित डब्यातील एका व्यक्तीने हात उंचावत हॅलो..इकडे इकडे..असे खुणावले़ तातडीने त्या डॉक्टरांनी डब्यात प्रवेश करून संबंधित अहमदाबाद ते कल्याण असा प्रवास करणाºया ज्येष्ठ महिलेची तपासणी केली, नंतर औषधोपचार करून पुढील उपचार कल्याणमध्ये करण्याचा सल्ला दिला..उपचारानंतर संबंधित प्रवाशांनी डॉक्टरांचे आभार मानत़़़तुम्ही देवासारखे धावून आलात, असे म्हणत सोलापूर इज बेस्ट सिटी, असे गौरवोद्गार काढले.
घडले असे की, सामाजिक जबाबदारीची जाणीव लक्षात घेऊन अश्विनी सहकारी रूग्णालयातर्फे सोलापूर रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे, अश्विनी रूग्णालयाचे अध्यक्ष बिपीनभाई पटेल, चेअरमन चंद्रशेखर स्वामी, व्हा़ चेअरमन डॉ़ विजय पाटील, संचालक डॉ़ सिध्देश्वर रूद्राक्षी, डॉ़ शंतनू गुंजोटीकर आदी मान्यवर उपस्थित होते़ कार्यक्रम सुरू झाला, प्रथमोपचार केंद्राचे उद्घाटन फीत कापून होणार होते..सगळी तयारी झाली..पाहुणे आले..एवढ्यात रेल्वे स्थानकावरील कार्यालयातील टेलिफोनची रिंग खणखणू लागली.. उद्यान एक्स्प्रेसमध्ये एका पेशंटची तब्येत बिघडली आहे, असा निरोप मिळाला़़़निरोप मिळताच तेथील संबंधित डॉ़ रणजित भोईटे यांनी तातडीने आपल्या टीममधील ब्रदर व्यंकटेश देशपांडे व मामा सिध्देश्वर सोनवणे यांना सोबत घेऊन फलाट क्रमांक ३ गाठले.
थोडक्याच वेळात एक्स्प्रेसचे आगमन होताच संबंधित टीमने पेशंट कुठे आहे हे शोधण्यास सुरूवात केली़़़डब्यातील पेशंट शोधण्यास १० मिनिटे लागली़ शेवटी रेल्वेच्या दरवाजात उभा असलेल्या प्रवाशांनी डॉक्टरांच्या टीमला पाहताच हाताने इशारा करीत या डब्यात पेशंट आहे असे खुणावले़़़़तातडीने संबंधित डॉक्टरांनी डब्यात प्रवेश करून बेंगलोर ते कल्याण यादरम्यान प्रवास करणाºया मधू आहुजा या ७१ वर्षीय पेशंटला तपासले़ व्हायरल इन्स्पेक्शन झाल्याने त्रास होऊ लागला आहे असे सांगत प्राथमिक स्तरावरील तपासण्या करून औषधोपचार केला़ मात्र कल्याणला पोहोचल्यानंतर तातडीने संबंधित हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला डॉ़ भोईटे यांनी दिला़
नातेवाईकांनी हात जोडत पाय धरले...- गाडी स्थानकावर दाखल होताच डॉक्टरांच्या टीमने संबंधित महिलेची प्राथमिक तपासणी केली़ नंतर औषधोपचार करून सल्ला दिला़ याचदरम्यान काही वेळ उशिरा पोहोचलेली उद्यान एक्सप्रेस रेल्वेच्या अधिकाºयांनी सामाजिक बांधिलकी जपत उपचार होईपर्यंत साधारण: १० ते १५ मिनिटे थांबविली़ झालेल्या दिरंगाईबद्दल व वेळेत उपचार केल्याबद्दल संबंधित प्रवाशाने सोलापूर विभागातील रेल्वे अधिकारी व कर्मचाºयांचे आभार मानले़ एवढेच नव्हे तर हात जोडत पाया पडताना डॉक्टरांनी त्यांना नकार देत हे आमचे कर्तव्यच असल्याचे सांगितले़
या आहेत प्रथमोपचार केंद्रातील सुविधा- रेल्वेत प्रवास करणाºया प्रवाशांसाठी अश्विनी रूग्णालयाने स्थानकावरील फलाट क्रमांक १ वर प्रथमोपचार केंद्र सुरू केले आहे़ या केंद्रात प्रवाशांना अत्यल्प दरात वैद्यकीय सेवासुविधा मिळणार आहेत़ हे केंद्र २४ तास सुरू राहणार असून १ डॉक्टर, १ नर्स, १ अटेंडन्स सेवा बजावणार आहेत़ तातडीची सेवा देण्यासाठी रेल्वेत जाऊन उपचार करता येईल. यासाठी केंद्रात जम्प किट तयार ठेवण्यात आले आहे़ या किटमध्ये आॅक्सिजनपासून ते रूग्णांसाठी लागणाºया सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे़ शिवाय तातडीच्या सेवेसाठी रूग्णवाहिकेचीसुद्धा उपलब्धता रूग्णालयाच्या वतीने करण्यात आली आहे़