अमित सोमवंशीसोलापूर दि ३ : शहरात गेल्या आठ दिवसांपासून दरोडेखोरांनी हैदोस माजवला असून, त्यांंना आळा घालण्यात पोलीस खाते हतबल असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याशिवाय घरफोड्यांचे सत्र सुरुच असून, रात्री गस्तही कुचकामी ठरत असल्याचे शहरवासिय भयभीत झाले आहेत. निर्ढावलेल्या चोरट्यांचा बंदोबस्त करुन दिलासा द्यावा, अशी मागणी शहरवासियांमधून जोर धरु लागली आहे.बुधवारी २९ एप्रिल रोजी बसवेश्वर तांड्यावर पाच जणांच्या अज्ञात टोळीने संगमेश्वर कोरे यांच्या घरात घुसून ठार मारण्याची धमकी देऊन २ लाख ५० हजार ४०० रुपयांचा ऐवज लुटला. याच दरोडेखोरांनी तांड्यावरील आणखी तिघांच्या घरात घुसून तेथील ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजस्वनगरात बापलेकीला मारहाण करुन ३३ हजार रुपयांचा ऐवज लुटला तर दुसरी घटना सूर्यप्रकाश नगरात घडली. अशा घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत़बसवेश्वर तांड्यावर पाच जणांच्या टोळीने संगमेश्वर काशिनाथ कोरे यांच्या घरी दरोडा टाकून १० तोळे सोने आणि १२ हजार ७०० रुपये रोकड पळवून नेली. याच तांड्यावरील धर्माबाई धोंडिराम राठोड यांच्या घरातून दोन तोळे सोने, दोन हजार रुपये, लक्ष्मण भीमा चव्हाण यांच्या घरातील ६ हजार ५०० रुपयांचा एक मोबाईल चोरला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच दरोडेखोरांनी राजस्वनगरात बापलेकीला मारहाण करुन ३३ हजार रुपयांचा ऐवज लुटला तर दुसरी घटना सूर्यप्रकाश नगरात घडली. येथेही दोघांना मारहाण करीत दरोडेखोरांनी २० हजार ७०० रुपयांचा ऐवज लुटला. दोन्ही दरोड्यात एकूण ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या प्रकरणांचा तपास अद्याप लागलेला नाही. दागिने चोरीतून अधिक पैसे मिळत असल्याने चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढलेले असताना आता चोरट्यांनी मोबाईल चोरण्याकडे मोर्चा वळविला आहे. घरफोड्यांचे सत्रही थांबायला तयार नाही. अशा स्थितीत शहरवासियांना निर्भयपणे रात्रीची झोप घेणेही अवघड होऊन बसले आहे. -------------------पोलिसांची रात्री गस्त असते का?सोलापूर शहरात पोलिसांची रात्रगस्त असते, मात्र रात्र गस्तीच्या नावाखाली पोलीस नेमके कुठे फेरफटका मारतात हा संशोधनाचा विषय आहे. फिक्स पॉइंटवरही पोलीस दिसत नाहीत. या सर्व प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून सहकुटुंब परगावी जाताना कोणीतरी घरामध्ये राहण्याची व्यवस्था करुनच जावे लागत आहे. पोलीस आयुक्तांनी याकडे विशेष लक्ष देऊन नागरिकांचे जीवन सुसह्य करावे, अशी मागणी होऊ लागली आहे.---------------------या ठिकाणी झाल्या चोऱ्या...१ एप्रिल रोजी हत्तुरे वस्तीत घराची भिंत फोडून दोन घरातील ५५ हजारांचा ऐवज चोरून नेला. च्बालाजीनगर झोपडपट्टीतील रहिवासी इस्माईल हबीब मुल्ला (वय ३६) यांचे घर फोडून चोरट्यांनी २० हजार ५०० रुपयांची रोकड चोरुन नेली. च्येथील कापड कारखानदाराने कामगारांच्या पगारासाठी आणलेली एक लाख रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने दुचाकीवर येऊन हिसका मारुन पळविली. च्संजय गांधी नगरात १ एप्रिल रोजी सहिरा इमामअली सय्यद (वय ४८) यांचे घर फोडून चोरट्यांनी ३१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.च्एटीएम मशीनमधून पैसे काढून देतो, अशी बतावणी करुन चौघांची तब्बल ६५ हजार ६०० रुपयांची फसवणूक केली. या चारही घटना स्टेट बँक आॅफ इंडिया एटीएममध्ये घडल्या आहेत.
दरोडेखोरांचा हैदोस; सोलापूरकर भयभीत
By admin | Published: April 03, 2017 2:36 PM