सांगोला : पाळीव जनावरांच्या शर्यतीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही कुत्र्यांच्या शर्यती आयोजन केल्याप्रकरणी पोलिसांनी अचानक छापा टाकून आयोजकासह १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर त्यांच्याकडून प्राणी व ५ वाहने, चारचाकी वाहनासह ४ दुचाकी अशी ५ वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई १० सप्टेंबर रोजी कोळा (ता. सांगोला) येथे करण्यात आली.
पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांना कोळा येथील कुराण फॉरेस्ट मधील मोकळ्या जागेत काही लोकांनी कुत्र्यांच्या शर्यतीचे आयोजन केले असून चारचाकी दुचाकी वाहनांसह लोक जमले आहेत, अशी खबर मिळाली होती. त्या आधारे पोलीस नाईक प्रमोद गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सुमित पिसे या पोलीस कर्मचाºयांनी त्या ठिकाणी छापा टाकून प्राणी व त्यांच्याकडील पाच वाहने ताब्यात घेतली.
तसेच सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असतानाही पाळीव प्राण्यांची शर्यत भरविल्याप्रकरणी पै. लक्ष्मण करांडे, समा जुनोनी, सागर करांडे, अजित शेदाळ, गणेश अशोक मोरे व उदय अरुण माने रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), प्रतीक देवेंद्र मरडे (रा. अंकली, ता. मिरज), ओंकार संजय भोसले (रा. आळती, ता. हातकणंगले), धनाजी जगन्नाथ पाटील व बजरंग तुळशीराम माने (रा. घाणंद), अनिल दºयाप्पा निळे व संजय मनोहर चौगुले (रा. जालिहाळ, ता. मंगळवेढा), सुनील पोपट चव्हाण व काशिलिंग हिंदुराव मंडले (रा. एखतपूर, ता. सांगोला) बाळासाहेब सोपान खांडेकर (कोळा), दत्तात्रय बाळासाहेब वाघमोडे (रा. सावे) व सदाशिव मधुकर बिचुकले (रा. बामणी) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत पोकॉँ सुमित पिसे यांनी फिर्याद दाखल केली असून तपास पोना. प्रमोद गवळी करीत आहेत.