सोलापूर : जोडबसवण्णा चौक येथील तीन मजली घराला बँकेने सील केले. सील करत असताना आत भटके कुत्रे जाऊन बसले. दोन दिवस न खाता पिता कुत्रे आतच अडकले. शेजारी राहणारे, बँकेचे कर्मचारी व पोलिसांच्या मदतीने कुत्र्याला बाहेर काढण्यात आले.
एका सहकारी बँकेचे कर्ज थकले होते. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत जोडबवण्णा चौक येथील तीन मजली घर सील केले. ही कारवाई सुरु असताना एक भटके कुत्रे आत गेले. याची कुणालाही कल्पना नव्हती. कर्मचारी निघून गेल्यानंतर कुत्रे भूंकू लागले. आधी वरच्या मजल्यावर असलेला कुत्रा खालच्या मजल्यावर येऊन भूंकू लागला. त्यामुळे शेजारी राहणारे विशाल सोलगी यांना त्याचा आवाज आला.
बँकेचे कर्मचारी, पोलिस आणि शेजारी यांच्या समोर घराचे सील काढण्यात आले. विशाल सोलगी व सचीन कलागते कुत्र्याला बाहेर काढले. बाहेर आल्यानंतर कुत्र्याने धूम ठोकली. कुत्र्याला बाहेर काढण्यास वाईल्डलाईफ कॉन्झर्व्हेशन असोसिएशनचे संतोष धाकपाडे यांनी मदत केली.