सोलापूर : जिल्हा औषध प्रशासनात केवळ एकच अधिकारी कार्यरत असून या अधिकाऱ्यावर जिल्ह्यातील साडे हजार हजाराहून अधिक औषध दुकाने, रक्तपेढ्या, औषध कंपन्या, ऑक्सीजन प्लान्ट यासह इतर संस्थांचा डोलारा आहे. विशेष म्हणजे, अन्न निरिक्षक पदावर कार्यरत असलेले सचिन कांबळे यांच्यावर सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. औषध प्रशासनात एकूण पाच पदे मंजूर असून अनेक महिन्यांपासून एकच पद कार्यरत आहे.
औषध निरिक्षक म्हणून सचिन कांबळे हे सध्या कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच औषध प्रशासनाचा सहाय्यक आयुक्त पदाचा भार आहे. वर्षभरापूर्वी डी. ए. जाधव हे सहाय्यक आयुक्त पदावरून सेवानिवृत्त झाले. तेव्हा पासून सचिन कांबळे यांनी सहाय्यक आयुक्त पदाचा अतिरिक्त भार स्वीकारला. डी. ए. जाधव यांच्या सेवानिवृत्तीनंतर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. परंतू, सदर पद रिक्तच आहे.