यामध्ये शेकाप, राष्ट्रवादी, काळे गट प्रणित श्रीगुरूदत्त बहुजन ग्रामविकास आघाडीतून हेमंतकुमार पाटील, भामाबाई भिलारे, परमेश्वर पाटील, आण्णासाहेब मेटकरी, अनिता चंदनशिवे - लोखंडे, मीनाबाई रूपनर, शशिकला महानवर, सुरवंता हेगडे, तर पांडुरंग परिवारातून जोतीराम आहेरकर, सुनील रोकडे, मंगलाबाई रणदिवे हे विजयी झाले.
श्रीगुरूदत्त बहुजन ग्रामविकास आघाडीकडून विठ्ठलचे माजी संचालक प्रकाश पाटील, माजी सरपंच डॉ. सुधाकर महानवर, काळे गटाचे भारत आंबुले, तर पांडुरंग कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे यांच्या गटात ही लढत झाली.
श्रीगुरूदत्त बहुजन विकास आघाडीचे मधुकर शेळके, माणिक लोखंडे, दीपक चंदनशिवे, गोरख पाटील, बाळासाहेब आहेरकर, औदुंबर शेळके, संभाजी मेटकरी, दादासाहेब पाटील, राजाभाऊ डोईफोडे, तानाजी शेवाळे, धनराज शेवाळे, शहाजी पाटील, विष्णूपंत हेगडे, शहाजी हेगडे, कुबेर शेळके, नामदेव बोरकर, नामदेव रूपनर, संतोष रूपनर, सुभाष कारंडे, नागनाथ मदने, मोहन कारंडे, हर्षवर्धन कारंडे, अमोल डोईफोडे, दादासाहेब मदने, आबासाहेब रणदिवे, अक्षय लोखंडे, बापू बिचुकले यांनी परिश्रम घेतले. (वा.प्र.)