पंढरपूर (जि़सोलापूर) : नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रा सोहळ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला ३ कोटी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून गतवर्षाच्या तुलनेत उत्पन्नात एक कोटी १७ लाखाची वाढ झाल्याची माहिती मंदिर समितीचे लेखाधिकारी सुरेश कदम यांनी दिली.२५ आॅक्टोंबर ते ११ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत कार्तिकी यात्रा पार पडली. या कालावधीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी विविध स्वरूपात मंदिराला देणगी दिली. यामध्ये विठ्ठलाच्या पायाजवळ २१ लाख ५६ हजार रुपये, रुक्मिणीच्या पायाजवळ ६ लाख ४१ हजार रुपये, हुंडी पेटीमध्ये ४५ लाख ८० हजार ७८० रुपये, देणगी पावतीद्वारे ८५ लाख २४ हजार ६७५ रुपये, लाडू प्रसादद्वारे ३४ लाख ८६ हजार ८५५ रुपये, परिवार देवताच्या माध्यमातून १४ लाख ७१ हजार ८४३ रुपये व फोटो विक्री, राजगिरा लाडू, अन्नदान तसेच अन्य मार्गाने मंदिर समितीस उत्पन्न प्राप्त झाले.
कार्तिकी यात्रेत विठोबा चरणी ३.१५ कोटींचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:31 AM