सोलापूर : मागील गाळप हंगामातील ऊस बिल ज्या कारखान्याने अद्याप ही शेतकऱ्याना दिले नाहीत. तसेच चालू वर्षी कारखाना चालू करताना एक रकमी एफआरपी घोषित करीत नाहीत तोपर्यंत कुठल्याही साखर कारखान्यांना चालू गाळप हंगामास परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी अक्कलकोट तालुका शिवसेनेच्यावतीने अक्कलकोट तालुका शिवसेनेचे उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
अक्कलकोट तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे गेल्या गळीत हंगामाची ऊस बिले थकीत आहेत. ते थकीत बिल शेतकऱ्यांना मिळेपर्यंत तसेच चालू गळीत हंगामाची एक रकमी एफ् आर पी हमी देईपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील व अक्कलकोट तालुक्यातील कारखान्याला चालू गळीत हंगामाची परवानगी देण्यात देऊ नये, अशा मागणीचे निवेदन अक्कलकोट शिवसेनेचे वतीने देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यानंतर साखर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या विषयावर सकारात्मक तोडगा न निघाल्यास साखर कारखान्याविरोधात जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे व उपजिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट तालुका शिवसेनेचे वतीने तालुका प्रमुख संजय देशमुख, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी उद्योगपती व सहकार क्षेत्रातील अनुभवी नेते धर्मराज राठोड उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना ठोस आश्वासन जोपर्यंत थकबाकीदार कारखान्यांनी शेतकऱ्यांचा पुर्ण बिल देत तो पर्यंत कारखान्यांना चालु गळीत हंगामाची परवानगी मिळणार नसल्याचे सांगितले.