सोलापूर : पावसाळा आला रे आला की, दूषित पाणी अनेक जलस्रोतांमध्ये मिसळले जाते अन् मग पाठीमागून दबा धरून बसलेले आजार हळूच आपल्या शरीरात शिरकाव करतात. बदललेल्या हवामानामुळे सर्दी, खोकला, गॅस्ट्रो, असे एक का अनेक पोटाचे विकार मागे लागतात. दवाखान्यात जाऊन जाऊन खिसा रिकामा केला जातो. हे सारे नको असेल, तर मग एकच करावे लागेल. दूषित पाणी शुद्ध करून प्यायला हवे. यासाठी घरगुती अंमल करा. सर्वांनाच प्यारा असलेल्या जिवासाठी एवढे तर करावेच लागणार ना!
पावसाळ्यात सर्वाधिक साथीचे आजार दूषित पाण्यामुळे बळावतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, अगदी घरगुती उपाय म्हणजे उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आरोग्याला अगदी उत्तम. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.
पाणी शुद्ध करण्यासाठी नेहमी गाळून घ्यावे आणि उंचावर झाकून ठेवावे. पिण्याच्या पाण्यात शेवग्याच्या शेंगाच्या वाळलेल्या बिया टाकून ठेवल्या, तर गाळ त्यात चिकटतो व खाली तळाशी बसतो. पाण्यावर तुरटी फिरवावी मग गाळ पाण्याच्या तळाशी बसून थोड्यावेळाने पाणी पिण्यास शुद्ध होते. हे घरगुती उपाय तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतात.
-----
पाणी उकळून प्या
- पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा आपणास घरच्या घरी करता येणार उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर कळसी, टाकीत भरून ठेवा. ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूंपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
- पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार.
- सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारही जडतात.
- कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यासारख्याही आजारांना मन्युष्य बळी पडतो.
- या आजारांमुळे आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
- दूषित पाणी आणि अन्नपदार्थांमधून संसर्गजन्य काविळीचा वाढ होते.
- उलटी व जुलाबामुळे शरीर कोरडे पडणे म्हणजेच गॅस्ट्रो. या रोगाचा फैलाव फार मोठ्या प्रमाणत होतो.
----
आजाराची लक्षणे
- पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.
- उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.
- सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.
- लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
- जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे
------
सोलापूर शहराच्या २०११ च्या जणगणनेनुसार लोकसंख्या १० लाख ५३ हजार आहे. शहरला दररोज ----------------------- एवढा पाणीपुरवठा होतो. लोकसंख्येनुसार पिण्यासाठी ----------------- एवढे पाणी लागते. उजनी धरणातून पाइलाइनद्वारे शहराला पाणीपुरवठा होता. पावसाळ्यात होणाऱ्या गळती अथवा धरणातील पाण्यामुळे दूषित पाणी मिसळल्याने सध्या शहर-जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे.
----