या राष्ट्रीय लोकअदालतीच्या पार्श्वभूमीवर मोडनिंब, जाधववाडी, बैरागवाडी, अरण व वरवडे येथील जनजागृती मेळावे घेण्यात आले. माढा तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा माढा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मा.एस.एस. सय्यद यांचे मार्गदर्शनाखाली फेसकॉमचे पुणे विभागाचे सचिव हनुमंत कुंभार यांनी केले. तालुका, जिल्हा, उच्च व सर्वोच्च न्यायालयात हजारो खटले न्यायाच्या प्रतीक्षेत प्रलंबित आहेत.
गटविकास अधिकारी डॉ.संताजी पाटील व गटशिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी विधिसेवा समितीच्या प्रतिनिधीसोबत फोनवरून संवाद साधला. या जनजागृती मेळाव्यात विस्ताराधिकारी सुतार, मोहन कुंभार, सतीश निंबाळकर, सौदागर कदम, मोडनिंबच्या सरपंच मीनाताई शिंदे, माजी उपसरपंच विशाल मेहता, जाधववाडीच्या उपसरपंच विष्णू घोलप, विलास जाधव, माउली सुर्वे, राहुल जाधव, अरणच्या सरपंच सुरत्नप्रभा ताकतोडे, उपसरपंच वसंत इंगळे, प्राचार्य हरिदास रणदिवे, ॲड.सत्यवान सुर्वे, ॲड.आनंदराव कुलकर्णी, ॲड.बाळासाहेब पाटील, ॲड.यशवंत सुर्वे, ॲड.गायकवाड आदी उपस्थित होते.