सोलापूर : ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता १८ दिवसांवर गेला आहे. गेल्या आठवड्यात १५ दिवसात रुग्ण दुप्पट होत होते. रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ झाली असून, सोमवारी हे प्रमाण ७0.४४ टक्क्यांवर गेल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील १०२९ गावांपैकी ५३५ गावांमध्ये कोरोना पोहोचला आहे.
उत्तर सोलापूर ७५ टक्के व दक्षिण सोलापूर तालुक्यात ६२.७ टक्के तर पंढरपूर तालुक्यात ६९.१, बार्शी तालुक्यात ६३.१, माळशिरस तालुक्यात ६२.६, मंगळवेढा व मोहोळ तालुक्यात ४६.८, अक्कलकोट व माढा तालुक्यात ४२.७, सांगोला तालुक्यात ४४.७ गावांमध्ये बाधा झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने आत्तापर्यंत ७४ हजार ३२ संशयितांची तपासणी केली, त्यामध्ये ७३ हजार ८९२ जणांचे अहवाल आले आहेत. यात ६४ हजार १७७ जण निगेटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण आता १३.१४ टक्के झाले आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या ९ हजार ७१६ पैकी ६ हजार ८४४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर २.८३ टक्के झाला आहे.
अशी आहे परिस्थितीमहिना पॉझिटिव्ह मृत्यू
- मार्च 00 00
- एप्रिल 0२ 0१
- मे ३८ 0४
- जून ३२१ १३
- जुलै ३२९२ ८५
- आॅगस्ट ६0६३ १७२
वयानुसार पॉझिटिव्ह
- वय संख्या
- १ ते १0 ५३२
- ११ ते २0 १0७६
- २१ ते ३0 २0२५
- ३१ ते ४0 १९२१
- ४१ ते ४९ १५८७
- ५१ ते ६0 १२0९
- ६0 वरील १३६६
- वयानुसार मृत्यू
वय रुग्ण
- १ ते १0 १
- ११ ते २0 १
- २१ ते ३0 ४
- ३१ ते ४0 ९
- ४१ ते ५0 ३५
- ५१ ते ६0 ५0
- ६१ वर्षांवरील १७५