ही घटना ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान घडली असून, याबाबत
शेतकरी संभाजी शंकर गवळी यांनी तालुका पोलिसांत रविवारी तक्रार देताच पोलिसानी अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.
संभाजी गवळी ट्रॅक्टर चालवून आपली उपजीविका करीत असून, त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी शेती व्यवसाय करण्यासाठी डबल पलटी व स्टीलचा नांगर विकत घेतला होता. ४ रोजी चुलत भावाच्या शेतातील नांगरणी केल्यानंतर हा नांगर घरासमोर ठेवला होता. त्यानंतर नांगरणीचे काम आल्याने ७ रोजी सकाळी पाहिला असता तो जागेवर दिसला नाही. त्याचा आजूबाजूला तपास केला असता तो मिळला नसल्याने पोलिसांत तक्रार दिली.