शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

फास्टॅग नसलेल्या वाहनांकडून दुप्पट टोल वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2020 10:55 AM

सोलापूर;  रोखीच्या लेनवर वाहनांची गर्दी, अद्याप फक्त सत्तर टक्केच फास्टॅगची नोंदणी

ठळक मुद्देजिल्ह्यातील प्रत्येक टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी कडकपणे सुरू फास्टॅग नसणाºयांना आता दुप्पट टोल भरावा लागत आहेवाहन चालकांनी लवकरात लवकर फास्टॅगची नोंदणी करून घ्यावी

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर धावणाºया वाहनांना आता टोलनाक्यांवर फास्टॅगद्वारे अर्थात इलेक्ट्रॉनिक्स प्रणालीद्वारे टोल भरणे बंधनकारक आहे़ फास्टॅग नसलेल्या वाहनांनी टोल नाक्यावरील फास्टॅग लेनवर प्रवेश केल्यास त्या वाहनधारकांकडून दुप्पट पथकर आकारला जात आहे. 

सोलापुरातील टोलनाक्यांवर अशा रोज शंभर ते सव्वाशे वाहनांवर कारवाई होत आहे़ १५ जानेवारीपासून प्रत्येक टोल प्लाझावर फक्त एका लेनवरच रोखीने टोल वसूल होत आहे़ त्यामुळे फास्टॅग नसलेल्यांची रोखीच्या लेनवर किमान अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत रांग लागलेली आहे.

 चारचाकी वाहनांना ६० रुपये नियमित टोल भरावा लागतो़ फास्टॅगची नोंदणी नसल्यास चारचाकी वाहनांना दुप्पट अर्थात १२० रुपये टोल भरावा लागत आहे़ १५ जानेवारीनंतर फास्टॅग नोंदणी मोहीम देखील गतिमान झाली आहे.

रोज दोनशे ते अडीचशे नवीन फास्टॅगची नोंदणी सुरू आहे़ मागील जानेवारीत तब्बल सहा हजारांहून अधिक वाहन चालकांनी फास्टॅगची नोंदणी केलेली आहे, तर फेब्रुवारीच्या पहिल्या चार दिवसांत आठशे फास्टॅगची नोंदणी झाली आहे़ अद्याप एकूण सत्तर टक्केच फास्टॅगची नोंदणी झाली असून, ३० टक्के नोंदणी बाकी आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्पाकडून मिळाली आहे़

चालकांनी लवकर नोंदणी करून घ्यावी- जिल्ह्यातील प्रत्येक टोलनाक्यावर फास्टॅगची अंमलबजावणी कडकपणे सुरू आहे़ फास्टॅग नसणाºयांना आता दुप्पट टोल भरावा लागत आहे़ पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सावळेश्वर, वरवडे (जिल्हा सोलापूर) येथील पथकर नाक्यावर, सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील तामलवाडी, येडशी व पारगाव (जिल्हा उस्मानाबाद) येथील पथकर नाक्यावर नवीन फास्टॅगची नोंदणी करता येते़ तसेच एसबीआय, आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस व इंडसइंड या बँकेत तसेच अमॅझॉन, पेटीएम, आॅनलाईन संकेतस्थळावर फास्टॅगची नोंदणी करता येते़ वाहन चालकांनी लवकरात लवकर फास्टॅगची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरhighwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकtollplazaटोलनाका