दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी, मंद्रूप, भंडारकवठे, मुस्ती, कर्देहळ्ळी, फताटेवाडी (एनटीपीसी) येथील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
गेल्या आठवड्यात ३२० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते, ही संख्या आता ७०५ झाली आहे. रुग्णसंख्येच्या प्रमाणात उपचारासाठी बेड मिळत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची सोलापूर शहरात बेड मिळवताना चांगलीच दमछाक होत आहे.
-------
सर्वाधिक रुग्णसंख्येची गावे
फताटेवाडी (एनटीपीसी) ८२, मंद्रुप ४७, अंत्रोळी ४६, विडी घरकुल ३५, कर्देहल्ली ४०, भंडारकवठे २९, गुंजेगाव २१, कुंभारी २८, कंदलगाव १६, मुस्ती १७, होटगी १६, अकोले (म) २२.
--------
चोवीस तासांत चार दगावले
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गुरुवारपर्यंत तालुक्यात सहा जणांचा मृत्यू झाला होता; मात्र गेल्या चोवीस तासात चार रुग्ण दगावले. त्यामुळे ही संख्या आता दहावर गेली आहे. सद्य:स्थितीत रुग्णसंख्या ७०५, उपचारानंतर ४१४ रुग्ण घरी गेले. दहा जणांचा मृत्यू झाला. कंबर तलावानजीकच्या कोविड सेंटरमध्ये २८१ रुग्ण आहेत.
-------