ठळक मुद्देमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवनकार्य आणि साहित्यासंदर्भात त्यांनी विशेष लेखन केले होतेनिधनाचे वृत्त समजल्यानंतर शहरातील मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिलीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली
सोलापूर - महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक, समीक्षक डॉ. गोपाळराव मारुतीराव उर्फ गो. मा. पवार (वय ८८) यांचे मंगळवारी पहाटे सहा वाजता निधन झाले. गो.मा. पवार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. गो.मा. हे मराठी साहित्याचे व्यासंगी समीक्षक होते.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जीवनकार्य आणि साहित्यासंदर्भात त्यांनी विशेष लेखन केले होते. त्यांना साहित्य अकादमीसह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. निधनाचे वृत्त समजल्यानंतर शहरातील मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.