शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
2
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
3
मला स्टार्क वैगेरे व्हायचं नाही; ऑस्ट्रेलियन स्टारशी तुलना केल्यावर आवेश खाननं असा दिला रिप्लाय
4
शेकापच्या संतोष पाटलांच्या दोन्ही मुलांचा वेळास बीचवर एकाच वेळी मृत्यू; बहिणीचा मुलगाही सुमद्रात बुडाला
5
"माय नेम इज खान"! LSG साठी आवेशची 'हिरोगिरी' यॉर्करचा मारा करत RR च्या हातून हिसकावून घेतला सामना
6
रशिया-युक्रेन युद्ध थांबले; तीन दिवस युद्धविराम जाहीर, व्लादिमीर पुतिन यांची घोषणा
7
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
8
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
9
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
10
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
11
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
13
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
14
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
15
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
16
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
17
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
18
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
20
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 05:45 IST

dr shirish valsangkar news: डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते. त्यासाठी ते आग्रही होते; पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे.

सोलापूर : विख्यात मेंदुविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांना त्यांच्या वळसंगकर हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने ते निराश झाले अन् त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला, अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात दबक्या आवाजात होत आहे.  याबाबत प्रतिक्रया घेण्यासाठी डॉ. वळसंगकर यांचे सुपुत्र डॉ. आश्विन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

...म्हणे कर्मचाऱ्याकडून धमकी!

डॉ. वळसंगकर यांना रुग्णालयातील सर्व आर्थिक व्यवहार कागदोपत्री हवे होते. त्यासाठी ते आग्रही होते; पण हल्ली रुग्णांकडून उपचाराची रक्कम कोणतीही नोंद न करता स्वीकारली जात असे. यासंदर्भात त्यांनी आक्षेप व्यक्त केला होता; पण त्यांचे कोणी ऐकत नव्हते. 

जी महिला कर्मचारी अशी रक्कम स्वीकारत होती तिला डॉ. वळसंगकर यांनी कामावरून काढून टाकले होते; पण नंतर या महिला कर्मचाऱ्याने कामावरून काढल्याबद्दल आत्महत्या करण्याची धमकी डॉक्टरांना दिली होती. 

तिच्या धमकीवरून डॉक्टरांना पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला होता; पण डॉक्टरांना हे मान्य नव्हते. अखेर या सर्व प्रकरणामुळे डॉक्टर तणावाखाली गेले अन् त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचीही चर्चा आहे.

गोरगरिबांची सेवा करता येत नसल्याने होते नैराश्यात

डॉक्टरांचे वडील डॉ. पद्माकर वळसंगकर हे जुन्या पिढीतील सामाजिक भान ठेवून काम करणारे रुग्णसेवक होते. त्या काळातील यशस्वी डॉक्टर होते; त्याचबरोबर नगरसेवकही होते. डॉ. शिरीष वळसंगकर हे राजकारणात सक्रिय झाले नसले तरी वडिलांच्या सामाजिक कार्याचा वसा त्यांनी घेतला होता. वैद्यकीय सेवा करताना गरीब रुग्णांचे बिल ते मोठ्या प्रमाणात माफ करायचे; पण गेल्या तीन-चार वर्षांत त्यांना हॉस्पिटलच्या व्यवहारातून दूर केल्याने त्यांना गोरगरिबांची अशी सेवा करता येईना. त्यामुळे डॉ. वळसंगकर निराश झाले, अशी निकटवर्तीयांच्या चर्चेतून ऐकायला मिळाले.

अंत्यसंस्काराला मोठी गर्दी 

डॉ. वळसंगकर यांच्यावर शनिवारी दुपारी मोदी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सोलापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक जीवदान मिळालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना अश्रू अनावर झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसdoctorडॉक्टरDeathमृत्यू