सोलापूर : धर्मवीर संभाजी महाराज तलावात गेली कित्तेक दिवस खराब पाणी मिसळत असल्याने तलावातील पाणी कायम दूषित बनलेले आहे. त्याच बरोबर या भागातील ड्रेनेज चोकअप होऊन टेलिग्राम सोसायटीत आणि पुढे तलावात पाणी पसरत आहे, त्यामुळे दुर्गंधी, रोगराई पसरण्याचा धोका कायम होत असून अशा परिस्थितीला या भागातील नागरिकांना तोंड द्यावं लागत आहे.
दरम्यान, यासाठी संभाजी आरमारने आयुक्तांची भेट घेऊन धर्मवीर संभाजी महाराज तलाव पूर्ण प्रदूषण मुक्त झाला पाहिजे आणि तलावात ड्रेनेजच्या पाण्याचा एक थेंब हि जाऊ नये अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्याची आणि त्यासोबतच येथील सदोष ड्रेनेज व्यवस्था दुरुस्त करण्याची संभाजी आरमार ने मागणी केली असता त्याची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी तलावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. शिवाय संबंधित खात्यास तातडीने सदोष ड्रेनेज दुरुस्त करून घेत तलावात जाणाऱ्या दूषित पाण्यास रोखण्याचे आदेश दिले.
यावेळी एका आठवड्याच्या आत ड्रेनेज दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आणि सोबतच तलावात जाणाऱ्या दूषित पाण्याला रोखण्यासाठी महापालिकेने ६१ लाखाची निविदा प्रक्रिया राबवलेली असून पावसाळ्याआधी हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे ,कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे ,सुधाकर करणकोट ,टेलिग्राम सोसायटीतील नागरिक उपस्थित होते