पंढरपूर : पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत तक्रारी आल्याने या कामास स्थगिती देण्यात आली आहे. मात्र ही स्थगिती उठली आहे, यामुळे ८९२ घरांची रद्द करण्यात आलेली लॉटरी सोडत सोमवारी (८ मार्च) ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. यामुळे अर्ज केलेल्या ९७० नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष साधना भोसले यांनी दिली.
भीमा नदीच्या पूररेषेत सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रकल्पाच्या कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह विविध संघटनांनी तक्रार केल्या होता. या कामास स्थगिती देण्याचे आदेश नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी दिले आहेत. यामुळे पंढरपूर पंतप्रधान आवास योजनेच्या कामाला स्थगिती दिलीच होती.
८९२ घरांचे काम पूर्ण झाले होते. या प्रकल्पातील ८९२ घरांची लॉटरी सोडत २६ जानेवारीला होणार होती. घर मिळावे यासाठी २०४५ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ९७० जणांनी १० हजार रुपये भरले होते. पूर्ण ८९२ झालेल्या घरांची लॉटरी सोडत सोमवारी होणार आहे.