आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ८ : स्पर्धा परीक्षेची सर्वाधिक जाणीवजागृती ग्रामीण भागात झाली आहे़ येथील मुलांमध्ये तयारी सर्वाधिक दिसते़ ही तयारी करताना मोठी स्वप्ने जरुर पाहा, परंतु त्यांना प्रयत्नांची जोड द्या़ आयुष्यात शिस्त पाळा़ आयुष्यात नैराश्य येऊ देऊ नका, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी केले़ ड्रीम फाउंडेशन, द युनिक अकॅडमी, द़ भै़ फ़ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलना(२०१८)चा दुसरा दिवस विचार मंथन आणि अनुभव सादरीकरणाने पार पडला़ संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना संबोधित असताना वरील आवाहन केले़ यावेळी नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे, दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार उबाळे, शिक्षणशास्त्रचे प्राचार्य एस़ बी़ क्षीरसागर, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशिनाथ भतगुणकी, संगीता भतगुणकी यांची प्रमुख उपस्थिती होती़ प्रारंभी अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले़ प्रास्ताविक काशिनाथ भतगुणकी यांनी केले़ डॉ़ भारुड म्हणाले, संविधानात जरी आरक्षणाची तरतूद असली तरी टॅलेंटला आरक्षण नाही़ स्वत:वर विश्वास ठेवा़ विचारांचे बीज पक्के करा़ नैराश्य येऊ देऊ नका़ आयुष्यात केलेला संकल्प नऊ दिवस पाळू नका़ करिअर कोणते निवडता हे महत्त्वाचे नसून सर्वात ताणतणावाचे काम हे प्रशासकीय सेवेतच आहे़ प्रेरणादायी लोकांची संगत ठेवा़ त्यांचे विचार कायम सोबत ठेवा़ कोणताही व्यवसाय, नोकरी वाईट नाही, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे़ स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होणे हे जीवनातील शेवटचे ध्येय नसून अंतर्मनाला आनंद देणारे जीवन जगणे महत्त्वाचे आहे़ यानंतर सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांचे वडील रामदास भाजीभाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना आदर्श माता-पिता पुरस्कार प्रदान करण्यात आला़ याला उत्तर देताना रामदास भाजीभाकरे म्हणाले की, रोहिणी ही चौथीमध्ये शिकत असताना तिला सोलापूरचे जिल्हाधिकारी दीपक कपूर यांची भेट घालून देत पुढे जाण्यासाठी प्रयत्न कसे करायला लावले याचा लघुपट उलगडला़ ---------------------इंग्रजी, गणिताची भीती बाळगू नका : तांबडे - पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले, कोणीही एमपीएससीची परीक्षा पहिल्या-दुसºया प्रयत्नात उत्तीर्ण होत नाही़ काहींचे आठ-आठ प्रयत्न होतात़ त्यात इंग्रजी, गणित विषयांची भीती अजिबात बाळगू नका़ त्याने काही फरक पडत नाही़ पूर्वी इंजिनिअर, डॉक्टर होण्याकडेच कल होता़ आता हा कल बदलला आहे़ आता दिसणारे सनदी अधिकारी हे बहुतांश सर्वसामान्य वर्गातील आहेत़ ज्यांनी चटके सोसले आहेत तेच अधिकारी झाले आहेत़ त्यामुळे खरे टॅलेंट हे ग्रामीण भागातच दिसते़ आयुष्यात संयम बाळगा़ अहंकार बाळगू नका़ लाल-पिवळा दिवा जनतेच्या सेवेसाठी आहे़ यावेळी शिक्षणशास्त्रचे प्राचार्य एस़ बी़ क्षीरसागर, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशिनाथ भतगुणकी, संगीता भतगुणकी, प्रा़ डॉ़ आऱ एऩ मुळीक, प्रा़ डॉ़ आऱ एऩ रणवरे उपस्थित होते़विचारांची गरिबी बाळगू नका : ढाकणे- कार्यक्रमास दुसरे अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलेले मनपा आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांनी मनोगतातून प्रथमत: आई-वडिलांचा आदर बाळगा, येथूनच आपल्या आयुष्याची सुरुवात होते, असे ते म्हणाले़ संपूर्ण शिक्षणाच्या काळात शेवटच्या बाकावर बसणारा माझ्यासारखा अधिकारी होऊ शकतो हे उदाहरण पुरेसे आहे़ विचारांची गरिबी बाळगू नका़ प्रयत्न करत राहा़ आपले ध्येय उच्च असावे़ चांगले शिक्षक निर्माण नाही झाले तर चांगले अधिकारी, व्यक्ती तयार होणार नाहीत़ समाजात शिक्षकांना किंमत दिली पाहिजे, त्यांची प्रतिष्ठा राखली पाहिजे़ आज शिक्षकापेक्षा तलाठी, ग्रामसेवकांची प्रतिष्ठा वाढली आहे़ जे काही करायचे आहे ते मनापासून करा़ शिस्त पाळा़ अवांतर वाचन करा़
स्वप्ने जरुर पाहा, त्यांना प्रयत्नांची जोड द्या, राजेंद्र भारूड यांचे मत, सोलापूरातील ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलनास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:01 PM
ड्रीम फाउंडेशन, द युनिक अकॅडमी, द़ भै़ फ़ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय व आंतरराष्ट्रीय हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ड्रीम स्पर्धा परीक्षा जागर साहित्य संमेलना(२०१८)चा रविवार दुसरा दिवस विचार मंथन आणि अनुभव सादरीकरणाने पार पडला़
ठळक मुद्देसंविधानात जरी आरक्षणाची तरतूद असली तरी टॅलेंटला आरक्षण नाही़ स्वत:वर विश्वास ठेवा़ विचारांचे बीज पक्के करा़ नैराश्य येऊ देऊ नका़ : डॉ़ भारुडसेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांचे वडील रामदास भाजीभाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना आदर्श माता-पिता पुरस्कार प्रदान करण्यात आला़ इंग्रजी, गणिताची भीती बाळगू नका : तांबडे