पंढरपूर : शिरढोण (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी धाड टाकून दोन वाहनांसह १ ब्रास वाळू असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र या कारवाई दरम्यान अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक व मालक पळून गेले आहेत.
या प्रकरणी आण्णा घंटे, लखन घंटे, महेश शिंदे, गोट्या अधटराव व दोन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.