कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांनी १३ फेब्रुवारी २०२० रोजी सांगोला शाखा कालवाच्या अस्तरीकरणाची कामे मंजुरीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. परंतु मंजुरीविना सदरचा प्रस्ताव प्रलंबित होता. प्रस्तावावर २२ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत सांगोला शाखा कालव्याच्या कि.मी. ८५ ते १०३ कामांना त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे आ. शहाजीबापू पाटील यांनी केली होती. सदर प्रस्तावाला महाराष्ट्र शासनाने ३० एप्रिल रोजी मंजुरी दिली आहे.
कोट :::::::::::::
सांगोला शाखा कालव्याच्या कि.मी. ८५ ते १०३ मध्ये अस्तरिकरणाच्या कामांना मंजुरी मिळाल्याने वरील गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. सर्व प्रलंबित कामे येणाऱ्या दोन वर्षांत पूर्ण करून घेण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.
- शहाजीबापू पाटील
आमदार, सांगोला