शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

तारापूर भिमा नदीपात्रातील होडी तुटल्याने बुडून एकाचा मृत्यू, ११ जण वाचले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 2:10 PM

आॅनलाइन लोकमत सोलापूरचळे/सुस्ते दि ६ : तारापूर (ता़ पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात होडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षांच्या बालकासह ११ जण वाचले़ अनिल अंकुश शिंदे (वय २६, रा़ तारापूर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ चळे येथील विलास बाळू गायकवाड यांच्या घरी चळेसह आंबे व ...

आॅनलाइन लोकमत सोलापूरचळे/सुस्ते दि ६ : तारापूर (ता़ पंढरपूर) येथे भीमा नदीपात्रात होडी पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर तीन वर्षांच्या बालकासह ११ जण वाचले़ अनिल अंकुश शिंदे (वय २६, रा़ तारापूर) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे़ चळे येथील विलास बाळू गायकवाड यांच्या घरी चळेसह आंबे व तारापूर या तीन गावच्या दर्लिंग देवाच्या वालगी मंडळांचा कार्यक्रम होता़ या कार्यक्रमासाठी तीनही गावांतील वालगी मंडळाचे तरुण चळे येथे आले होते़ दर्लिंग मंडळाचा वालग्याच्या कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी ३़३० च्या सुमारास तारापूर येथील वालगी मंडळाचे तरुण परत गावी जाण्यासाठी भीमा नदीपात्रातून होडीतून जात होते़ बायडाबाई भोई, लताबाई भोई या दोन महिला होडी चालवित होत्या़ होडी मध्यभागी आली असता ती अचानक तुटली़ त्यात गोपाळ शिंदे, जगन्नाथ कांबळे, सचिन पाटील, वैभव वाघमोडे, बबलू पाटील, काका वाघमोडे, अनिल शिंदे, राजू घोरपडे, शशिकांत शिंदे यांच्यासह तीन वर्षांचा बालक होता़ होडी तुटल्यानंतर काहीजण पोहून बाहेर निघाले़ काका वाघमोडे यांनी दोन महिलांना व तीन वर्षांच्या मुलाला वाचविले़ दरम्यान, घटनेची माहिती कळताच तारापूर येथील ग्रामस्थांनी चार होडीच्या सहाय्याने भीमा नदीपात्रात बापू भोई, संजय भोई या होडी चालकांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली़ सायंकाळी ६़३० वाजण्याच्या सुमारास काकासो निंगदेव वाघमोडे व गोरख वाघमोडे यांना अनिल शिंदे याचा मृतदेह आढळून आला़ मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पंढरपूरला नेण्यात आला आहे़ अनिल शिंदे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन बहिणी असा परिवार आहे़