विजयाच्या आत्मविश्वासामुळेच गतवेळच्या लोकसभेत पराभव : सुशीलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:25 PM2019-01-22T15:25:11+5:302019-01-22T15:26:56+5:30
मंद्रुप : सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याच्या आत्मविश्वासामुळे आपला पराभव झाल्याचे मान्य केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ...
मंद्रुप : सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्याच्या आत्मविश्वासामुळे आपला पराभव झाल्याचे मान्य केले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे मल्लिकार्जुन व विश्वनाथ शेगावकर यांच्या शेतामध्ये हुरडा पार्टी कार्यक्रमात ही भावना व्यक्त केली.
यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राजशेखर शिवदारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, नगरसेवक चेतन नरोटे, उपसभापती श्रीशैल नरोळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश हसापुरे, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, राष्ट्रवादीचे आप्पाराव कोरे, चंद्रकांत सुर्वे, भीमाशंकर जमादार आदी व्यासपीठावर होते.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत दक्षिणच्या नेत्यांनी एकजूट दाखविल्याने काँग्रेसचा दणदणीत विजय झाला. आता ही एकजूट आगामी लोकसभा निवडणुकीतही कायम राखावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सध्या देशभरात भाजपविरोधात लाट आहे. याचा फायदा घेऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेसने आजवर साधलेला विकास जनतेपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. दक्षिण तालुक्यातील कमळे गुरुजी, वि.गु. शिवदारे, आनंदराव देवकते यांची आठवण त्यांनी यावेळी केली. त्यांच्या शब्दात ताकद होती, अशा शब्दात त्यांनी उल्लेख केला.
सतीश पाटील, जाफरताज पाटील, महेश पाटील, रमेश आसबे, सरपंच रावसाहेब पाटील, मुंजप्पा कोले, अर्जुन टेळे, विश्वनाथ शेगावकर, मल्लिकार्जुन शेगावकर, बसवराज शेगावकर, काशिनाथ सोरेगावकर यांच्यासह वांगी, हत्तूर, वडकबाळ, मनगोळी, अकोले, गुंजेगाव, कंदलगाव, गावडेवाडी, अंत्रोळी व वडापूर गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.
दबावाचे राजकारण
- माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, दक्षिण सोलापूर तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला असताना गेली लोकसभा व विधानसभेत दुसºया पक्षातील लोकांनी शिरकाव केला. चार वर्षांत देशात दबावाचे राजकारण चालले, असा आरोप त्यांनी के ला. शेळके यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.