शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कोरोनामुळे सोलापूरच्या महापौरांसह पदाधिकारी घरातच करणार विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 2:52 PM

कोरोनाला रोखणार : मनपात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक

ठळक मुद्देमनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रामध्ये गणेश मूर्ती संकलित करण्याची ठिकाणे निश्चित केलीगणेश मंडळांनी विभागीय कार्यालयांशी संपर्क करावा. गणेश मूर्ती त्या ठिकाणी सुपूर्द कराव्यातसर्व गणेश मूर्ती संकलित केल्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या मंठाळकर वस्ती येथील खाणीमध्ये विसर्जित

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आपल्या घरातील गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक आपल्या घरीच विसर्जन करण्याचा निर्णय महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह मनपातील पदाधिकाºयांनी घेतला आहे. शहरातील नागरिकांनी याच पद्धतीने विसर्जन करावे, असे आवाहन महापौरांनी  केले.

या पार्श्वभूमीवर महापालिकेत शुक्रवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांची महापौरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, उपमहापौर राजेश काळे, सभागृह नेते श्रीनिवास करली, नगरसेवक नागेश वल्याळ, सुभाष शेजवाल, उपायुक्त अजयसिंह पवार, सहा.आयुक्त श्रीराम पवार, विक्रमसिंह पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापौर यन्नम म्हणाल्या, घरगुती गणेश मूर्तींचे घरातच पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करावे. आम्ही नगरसेवकांनाही याबाबत आवाहन करणार आहोत. सभागृह नेते श्रीनिवास करली यांनीही आपल्या घरीच विसर्जन करणार असल्याचे सांगितले. यावेळी विविध मंडळांच्या पदाधिकाºयांनी सूचना केल्या. मनपाने विधिवत विसर्जन करावे, अशी मागणी केली. यावेळी सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मनपा खाणींमध्ये विसर्जनमनपाच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या क्षेत्रामध्ये गणेश मूर्ती संकलित करण्याची ठिकाणे निश्चित केली आहेत. गणेश मंडळांनी विभागीय कार्यालयांशी संपर्क करावा. गणेश मूर्ती त्या ठिकाणी सुपूर्द कराव्यात. सर्व गणेश मूर्ती संकलित केल्यानंतर महापालिकेच्या मालकीच्या मंठाळकर वस्ती येथील खाणीमध्ये विसर्जित करण्यात येतील. 

घरीच करा विसर्जन, सेल्फी पाठवा ‘लोकमत’लागणेश मूर्तींचे आपल्या घरी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करणाºया नागरिकांनी एक सेल्फी काढून ‘लोकमत’ला व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवावा. हा सेल्फी लोकमतच्या अंकात प्रसिद्ध करण्यात येईल. गणेशभक्तांनी आपले नाव आणि सेल्फी ९५४५४४४८०७ व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवावा.

टॅग्स :SolapurसोलापूरGanesh Mahotsavगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका