सोलापूर : विकास प्रक्रियेत एक पाऊल पुढे टाकलेल्या हिरज गावात एक-दोन जागांचा अपवाद सोडला, तर निवडणूक बिनविरोध झाली. साखरेवाडी, राळेरास या गावांतही प्रत्येकी दोन जागांसाठी मतदान झाले. कळमणकरांनीही विकासाचा मुद्दा पुढे करीत सत्तांतर केले आहे. विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी निवडून आलेल्यांचा कल राष्ट्रवादी- व शिवसेनेकडे असल्याचे दिसत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावांतील मतदारांनी सत्ताधाऱ्यांना नाकारले आहे. मात्र, विकासाच्या आणा-भाका वाहिल्या आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे व आमदार यशवंत माने, तसेच माजी आमदार दिलीपराव माने यांचा आश्रय निवडून आलेले सदस्य घेताना दिसत आहेत.
नान्नजमध्ये राष्ट्रवादी- भाजपाच्या आघाडीने १०, तर शिवसेना- राष्ट्रवादी प्रकाश चोरेकर गटाने ७ जागा जिंकल्या. बीबीदारफळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनलचे चार, तर विरोधी गटाचे ११ सदस्य विजयी झाले. आता विरोधी गटही राष्ट्रवादी म्हणत आहे. कळमणचीही स्थिती अशीच झाली आहे.
---
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे-
तळेहिप्परगा- वैशाली धुमाळ, रोहन भिंगारे, शांताबाई उंबरे, विशाल कांबळे, शोभा कांबळे, शिवगंगा चौगुले, संगीता जाधव, मेघराज काळे, ललिता सुरवसे, अनिता बचुटे, सचिन भिंगारे, शारदाबाई धुमाळ, अनिता शिंदे.
बाणेगाव- बाबासाहेब देवकते, अनिल पाटील, लक्ष्मी थोरात, लिंबाजी जाधव, कीर्ती चाफाकरंडे, वर्षा कांबळे, कोमल चव्हाण, रोहिणी गावडे.
कळमण- सुनील पाटील, द्रौपती जगझाप, संगीता डोके, प्रकाश उगावडे, विनोदा भोरे, पांडुरंग लंबे, अनुसया शेळके, शांताबाई माळी, दीपक क्षीरसागर, कुमार पाटील, राधा क्षीरसागर.
तिर्हे- बळीराम जाधव, कमल पिसे, तुकाराम मल्लाव, जयश्री लवटे, शुभांगी सुरवसे, नेताजी सुरवसे, मंगल सोनटक्के, स्वाती पवार, संजय राठोड, गोवर्धन जगताप, वालूबाई राठोड, नारायण गायकवाड, अनिता गायकवाड (येथे शुभांगी सुरवसे यांनी जाऊ
स्वाती संदीप सुरवसे यांना पराभूत केले).
एकरुख-तरटगाव- श्याम उडाणशिवे, नसीर जहागीरदार, मंदाकिनी उडाणशिवे, अजय सीताफळे, उमर जहागीरदार, सिंधूबाई गुत्ती, कलावती भोरे (येथे दोन सदस्य अविरोध झाले आहेत).
राळेरास- छाया जाधव, सीताराम साबळे (येथील पाच सदस्य अविरोध).
साखरेवाडी- हरी क्षीरसागर, ताहिरा शेख (येथे पाच सदस्य अविरोध झाले आहेत).
हिरज- इलाई पटेल, गणपत कांबळे (येथील ९ सदस्य अविरोध झाले आहेत).