आॅनलाइन लोकमत सोलापूरवैराग दि २५ : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़ या घटनेत एक अल्पवयीन मुलगी सुदैवाने वाचल्याची माहिती समोर आली आहे़ या घटनेची नोंद वैराग पोलीसात झाली आहे. उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय -२५) त्यांची मुलगी सुजिता ( वय -१० ) या असे मयत झालेल्या मायलेकीचे नाव आहे़ घटनेची खबर बापू बाजीराव काळे यांनी वैराग पोलिसात दिली आहे .दरम्यान, देवाच्या कार्यक्रमासाठी मूळ माणेगांवचे इबीतवार कुटुंब हे मुंबई येथून मानेगांव येथे आठ दिवसांपूर्वी आले होते़ दरम्यान मंगळवारी दुपारी गावतळ्यामध्ये धुणे धुण्यासाठी उषाबाई दत्तात्रय इबीतवार (वय -२५)हिच्यासमवेत त्यांची मुलगी सुजिता ( वय -१० ) आणि नातेवाईकांची मुलगी राणी गोपीनाथ काळे ( वय -१०) या दोघीही तळ्यावर गेल्या. त्यावेळी तोल जावून राणी गोपीनाथ काळे ही पाण्यात पडली. तिला पोहता येत नसल्याने ती बुडू लागली. तिला वाचविण्यासाठी उषाबाई दत्तात्रय इबीतवार हिने पाण्यात उडी घेतली पण तिलाही पोहता येत नसल्याने ती ही बुडू लागली. हा सगळा प्रकार पाहणाºया सुजिताने बुडणाºया आईला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. सुजितालाही पोहता येत नसल्याने तिघीही बुडू लागल्या. हा प्रकार कृष्णा विठ्ठल काळे ( वय -८ ) याने पाहिला या घटनास्थळापासून दूर असणाºया समाधान ताटे, बबलू पाखरे ,शिवा काळे यांना सांगितले. या तिघा युवकांनी लगेच उड्या टाकून तिघींना बाहेर काढले. त्यांना तात्काळ वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच उषाबाई दत्तात्रय इबीतवार आणि त्यांची मुलगी सुजिता दत्तात्रय इबीतवार यांचा दुदेर्वी मृत्यू झाला होता. तर राणी गोपीनाथ काळे हिला योग्य वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून वैदयकीय अधिकारी डॉ.जयवंत गुंड यांनी बेशुद्ध असलेल्या राणीचे सीपीआर केले़ त्यामुळे ती ५ मिमिटात शुद्धीवर आली व तिचे प्राण वाचविण्यात यश आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बार्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेची वैराग पोलीसात नोंद आली आहे.
पाण्यात बुडून माय लेकींचा मृत्यू, सोलापूरातील घटना
By appasaheb.dilip.patil | Published: July 25, 2017 7:56 PM
वैराग दि २५ : बार्शी तालुक्यातील मानेगांव (धा ) येथे गावतळ्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय लेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार २५ जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास घडली़
ठळक मुद्देएक अल्पवयीन मुलगी सुदैवाने वाचल्याची माहितीया घटनेची नोंद वैराग पोलीसात मुंबई येथून मानेगांव येथे आठ दिवसांपूर्वी आले होते़