मंगळवेढा : परतीच्या पावसाने थैमान घालावयास सुरवात केली यामुळे सर्व ओढे, नाले पात्राबाहेरयेऊन वाहत आहे मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याने अडले गेले आहेत विशेष म्हणजे दुष्काळी पट्ट्यात ही बेसुमार पाऊस झाल्यामुळे तब्बल १०८ वर्षानी माण नदीला पूर आलेला असल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात़ १३५ किलोमीटर लांबीची असणारी माण नदी ही उगमस्थाना पासून शेवट पर्यत ओसंडून वाहत असून हे आश्चर्य असल्याचे नागरिक सांगत आहेत.
माण नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे या वाढत्या पाण्यामुळे मंगळवेढा- पंढरपूर महामार्ग बंद करण्यात आला आहे़ कुळकजाई माण( जि. सातारा) येतील डोंगरातून उगम पावणारी माण नदी गेली अनेक वर्षें पूर्णत: कोरडी ठणठणीत होती. कुळकजाई ते सरकोली ( ता पंढरपूर) असा या नदीचा प्रवाह असून या नदीवर कोल्हापूर पद्धतीचे अनेक बंधारे आहेत.
मंगळवेढा तालुका- गुंजेगाव येथे उभारण्यात येणारा प्रकल्प भविष्यात ३५ गावांना जीवनदान ठरणार आहे. या शिवाय उभारण्यात येणाºया काही प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे. त्यांमध्ये लघु पाटबंधारे तलाव -अंकलगी व शेगाव (तालुका जत) या प्रकल्पाना पाण्याचा फायदा होणार आहे. ही नदी मंगळवेढा गुंजेगाव मार्गे पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे भीमा नदीस मिळते़ सुमारे २० ते ३० वर्षांपूर्वी ही नदी बारमाही वाहत होती. आज कित्येक वर्षांनी ही नदी उगमस्थाना पासून शेवट पर्यत वाहत असून हे आश्चर्य असल्याचे नागरिक सांगत आहेत.