या योजनेंतर्गत सांगोला शाखा कालव्याच्या लाभक्षेत्रात सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. टेंभू उपसा सिंचन योजनेंतर्गत जुनोनी पाटबंधारे शाखा कालवा कार्यालयाकडून उन्हाळी हंगामासाठी लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन पाणी मागणी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, चार ठिकाणांहून अत्यल्प पाणी मागणी आली आहे. सध्या टेंभू योजनेद्वारे कालव्यातून पाणी सोडले आहे, परंतु मागणीअभावी उन्हाळी आवर्तन बंद होणार असल्याचे संकेत शाखा अभियंत्याकडून मिळाले आहेत.
जुनोनी येथील यमाई तलावाच्या लाभक्षेत्रात २५० एकर क्षेत्र ओलिताखाली येते. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे शेतातील उभ्या पिकांबरोबर डाळिंब, आंबा, चिकूसह फळबागेला पाणी देण्यासाठी टेंभूचे पाणी उपयुक्त ठरणार असल्याने शेतकऱ्यांकडून मागणी केली आहे. सध्या बुद्धेहाळ तलावातून लाभक्षेत्रातील उभी पिके व फळबागांना उन्हाळी आवर्तन सोडले आहे.
कोट :::::::::::::::
उन्हाळ्यात शेतकऱ्यांकडून उभी पिके व फळबागांसाठी पाणी उपसा होत असल्याने, माण नदीवरील सर्वच १८ बंधारे कोरडे पडले आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी मागील थकबाकीतील काही पैसे व चालू पाणीपट्टी भरण्याच्या अटीवर माण नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता, आटपाडी व बेलवण नाल्यातून माण नदीवरील बंधारे भरून देण्याची नियोजन आहे.
- एल.बी. केंगार
अभियंता