शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

या कारणामुळे सोलापुरात वाढला उष्माघाताचा धोका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 1:13 PM

महेश कुलकर्णी  सोलापूर : नेहमी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढणारे तापमान यावर्षी मार्च महिन्यात वाढले आहे.  मोठ्या प्रमाणात उष्णता ...

ठळक मुद्देचाळिशीवरच्या तापमानानं उष्माघाताचा वाढला धोका‘ड्राय वेदर’मध्ये त्वचा अन् डोळ्यांना उन्हापासून जपा !काळजी घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला : जीवनशैलीत बदल करण्याचेही आवाहन

महेश कुलकर्णी सोलापूर : नेहमी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वाढणारे तापमान यावर्षी मार्च महिन्यात वाढले आहे.  मोठ्या प्रमाणात उष्णता वाढल्यामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांनी उन्हाळ्यात शरीराची काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका संभवू शकतो. सोलापुरातील वेदर ड्राय असतो. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

होळी पार पडली की, उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरात आणि बाहेरही वाढते. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंनी घ्यावी लागते. सोलापुरात दरवर्षी कडक आणि चटके देणारा उन्हाळा असतो. हा उकाडा माणसाला उष्माघातापर्यंत नेतो. म्हणूनच उन्हाळ्यात खूप काळजी घ्यावी लागते. ही काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन सर्वांना माहीत असले पाहिजे. कारण नेहमीच्या जीवनशैलीतच बदल करावा लागतो.

उन्हात फिरण्याचे टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील, यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मात्र उन्हातून फिरण्याची वेळ आल्यास डोळे, डोके व शरीर यांना संरक्षण देणे गरजेचे आहे; तसेच उन्हातून फिरून आल्यानंतर थंड पेय लगेच पिण्याचे टाळावे. उन्हाळा जाणवू लागला आहे. दुपारी अंगाची काहिली होत आहे. काहीवेळा ग्लानी आल्यासारखे वाटते. डोळ्यात काही वेळा लाली येऊन ते चुरचुरल्यासारखे वाटतात. त्यामुळे प्रत्येकानेच स्वत:हून काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. मनोज जैन यांनी सांगितले.

मुतखडा आणि मूळव्याधीचा धोका अधिक - मनोज जैनउन्हाळ्यात डीहायड्रेशनचे प्रमाण जास्त असते. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे गरम हवामानात किडनी स्टोन आणि मूळव्याधीचे रुग्ण वाढतात. उघड्यावरील पदार्थ, रंगीबेरंगी सरबते, उघड्यावर कापून ठेवलेली फळे सेवन केल्यामुळे विषबाधा होण्याचा धोका असतो. मांसाहार टाळून अधिक पाणी आणि सॅलेडचा रोजच्या जेवणात समावेश करावा, असे सर्जन डॉ. मनोज जैन यांनी सांगितले.

त्वचेचा बचाव करण्यासाठी करा हे उपाय - नितीन ढेपेउन्हामुळे त्वचेवर घामोळ्या, फोड आणि जंतुसंसर्ग होतो. अनेक वेळा काळजी न घेतल्यामुळे त्वचा काळवंडते. यासाठी भरपूर पाणी पिणे, दिवसातून दोन वेळा थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करावी. या पाण्यात दोन थेंब जंतुनाश द्रव्य मिसळावे. बाहेर फिरताना घट्ट वीण असलेले अंगभर सुती कपडे आणि चेहरा पूर्ण झाकल्यास उन्हापासून बचाव करता येतो, असे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नितीन ढेपे यांनी सांगितले.

दिवसातून तीन वेळा डोळे धुवा - नवनीत तोष्णीवालउन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. कडक उन्हामुळे डोळ्यांची आग होऊ शकते. उन्हाळ्यात घेण्यात येणारा गॉगल हा त्याच्या काचा शास्त्रशुद्ध आहेत हे तपासून घ्यावे. दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. पाण्याच्या लेअरमुळे डोळे सुरक्षित राहतात. उन्हात फिरल्यामुळे डोळ्यातील पाणी ड्राय होते, हे टाळण्यासाठी गॉगल आणि टोपी वापरावी, असा सल्ला नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. नवनीत तोष्णीवाल यांनी दिला. 

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमानHealthआरोग्यMedicalवैद्यकीय