पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात पोलिसांनी अतिक्रमणावर कारवाईचा बडगा उगारताच, व्यापाºयांनी आ. भारत भालके यांच्याकडे गाºहाण मांडले. त्यानंतर त्या ठिकाणी आ़ भारत भालके दाखल होऊन चुडे विकणाºया वृद्ध महिला व्यावसायिकेला का मारहाण करता, असे विचारताच आ. भारत भालके व पोलीस अधिकाºयांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
मंदिर परिसरात अनेक व्यापाºयांनी अतिक्रमण केले होते. यामुळे रस्ता अरुंद झाला होता. विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढल्यास भाविकांना ये-जा करताना रस्ता अपुरा पडत होता. यामुळे मंदिर परिसरातील अतिक्रमण पोलिसांनी काढले होते. तसेच त्याठिकाणी फेरीवाल्यांना, छोट्या व्यापाºयांना रस्त्यावर व्यवसाय करण्यास बंदी केली.
छोटा व्यवसाय करणाºयांनी त्याचे रडगाणे आ. भारत भालके यांच्याकडे मांडले. यामुळे आ. भारत भालके, नगरसेवक डी. राज सर्वगोड, माजी नगरसेवक नागेश यादव, राष्टÑवादी शहराध्यक्ष सुधीर भोसले, संदीप मांडवे, शंकर सुरवसे, काँग्रेसच्या शहराध्यक्षा आशा बागल व छोट्या व्यावसायिकांना घेऊन श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाजवळ बसले.
यावेळी आ. भालके यांनी कारवाई करणारे पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांना बोलावून घेतले़ साळोखे यांनी कायदेशीर काम करत असल्याचे सांगितले. यावरून आ. भारत भालके व साळोखे यांच्यात वाद झाला. पंढरपूरच्या मंदिर परिसरात नेहमी अतिक्रमण काढण्यात येते. पुन्हा छोटे व्यावसायिक त्या ठिकाणी आपले बस्तान बसवितात. हा प्रकार प्रत्येकवेळी घडतो. पण प्रशासन ठोस भूमिका घेत नाही.
भालके म्हणतात.. वृद्ध महिलेला झाली होती मारहाण- मंदिर परिसरात व्यवसाय करणाºया छोट्या व्यापाºयांना मंदिर पोलिसांनी बंदी केली आहे. यामध्ये चुडे, फुले, फळे, खेळणी व अन्य साहित्य विक्री करणाºयांचा सहभाग आहे. या छोट्या व्यावसायिकांचे साहित्य उद्ध्वस्त करण्याचे काम पोलीस करत आहेत. व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाºया वयोवृद्ध महिला पुष्पा अंबादास इंदापूरकर यांना पोलिसांनी मारहाण केली. पोलिसांच्या या कारवाई विरोधात आ़ भालके यांनी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, वरिष्ठ पोलीस अधिकाºयांना व प्रांताधिकाºयांकडे तक्रार केली आहे. अतिक्रमण कारवाईविरोधात आपण मतदानावर बहिष्कार टाकण्याचे व्यावसायिकांनी सांगितले.