सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी येथे चार चाकी वाहनाने साळींदर या प्राण्याला चिरडले. त्यामुळे जवळगी रस्त्यावर रक्त आणि काट्याचा सडा पडला होता.प्राणीमित्र सामाजिक संस्थेचे मल्लिकार्जुन यांनी याची माहिती वन विभागाला दिली. वनविभागाने सालिंदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले.
सध्या साळींदर या प्राण्याचा मिलनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे ते संध्याकाळपासून सकाळपर्यंत बाहेर दिसतात. याच काळात दोन साळिंदर फिरत असताना बंकलगी-जवळगी रस्त्यावर वाहनाने एका साळींदरला चिरडले. या अपघातात एका साळींदरचा जागेवर मृत्यू झाला तर दुसरे जखमी साळींदर पळून गेले.
मल्लिकार्जुन धुळखेड यांनी ही घटना पाहिली त्यांनी त्वरित विभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी साळींदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. साळींदर हा प्राणी कंदमुळे शेंगा आधी जमिनीतील पदार्थ शोधून खातात. हा प्राणी निशाचर असल्यामुळे रात्रीच बाहेर पडतो. काही वेळा सकाळी किंवा दुपारी दिसतो अशी माहिती मल्लिकार्जुन धुळखेडे यांनी दिली.