अरुण बारसकर सोलापूर दि २९ : झपाट्याने होणाºया प्रगतीमुळे बेसुमार झालेली कर्मचारी भरती आज दूध संघाला हानिकारक ठरत असून, मागील वर्षभरात ११६ कर्मचारी कमी होऊनही अतिरिक्त २०० कर्मचाºयांचा भार संघाला सोसावा लागत आहे. शासनाने दूध खरेदीदरात केलेली वाढ संघाला अडचणीची ठरत असल्याचे सांगितले जात असले तरी खासगी संस्थांचे आव्हान पेलण्याकडे केलेले दुर्लक्षच संघ अडचणीचे खरे कारण आहे.सोलापूर जिल्हा सहकारी संघाची मोठी भरभराट झाली ती आमदार बबनराव शिंदे व मनोहर डोंगरे चेअरमन असताना. दूध संघाचे जाळे जिल्हाभर पसरत असताना राज्याच्या कानाकोपºयात दूध पंढरीच्या दुधाला मागणी होती. अवाढव्य खर्च व गरजेपेक्षा अधिक कर्मचारी असतानाही दूध संघ जोमात होता. मात्र मागील पाच-सात वर्षांत दूध पंढरीला उतरती कळा लागली आहे. दूध संकलन साडेचार लाख लिटरवरुन सव्वा लाखापर्यंत आले. संकलन कमी झालेले असतानाही आहे त्या दुधाच्या विक्रीची व्यवस्थाही करण्याकडे पदाधिकारी व अधिकाºयांनी दुर्लक्ष केले. मागील वर्षभरात संघाच्या ११६ कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. सध्या संघाकडे ५१५ कर्मचारी कार्यरत असून, आजही २०० कर्मचारी अतिरिक्त असल्याचे संघाकडून सांगितले जाते. कर्मचाºयांच्या वेतनावर दरमहा ५५ लाख रुपये खर्च होत असून, स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाºयांमुळे वेतनाचे महिन्याला ११-१२ लाख रुपये वाचले आहेत. राज्यभरात विशेषत: पश्चिम महाराष्टÑात खासगी संघांचे वारे जोरात वाहू लागले असताना मागील १०-१२ वर्षांत दूध संघाच्या पदाधिकाºयांनी दूध विक्रीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे होते. पॅकिंग दूध विक्रीचे जाळे निर्माण करण्याऐवजी सुरू असलेल्या ठिकाणाचीही दूध विक्री बंद झाली. काही ठिकाणाच्या विक्रीत मोठी घट होत असताना वाढ होण्यासाठी पावले उचलली नाहीत. यामुळे दूध संघ आज मेटाकुटीला आला असून, वरकरणी काटकसर सांगितली जाते. ---------------------पदाधिकाºयांचे खासगी संघ- खासदार राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी(कोल्हापूर), दशरथ माने यांचा सोनाई(इंदापूर), काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा राजहंस तर अलीकडे राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांच्या अखत्यारित कळस, ता. इंदापूर नेचर डिलाईट हा खासगी संघ बाळसे धरू लागला आहे. मराठवाड्यातील नॅचरल डेअरीची शाखा सोलापूर जिल्ह्यात येत आहे. गोविंद(फलटण), आरोग्य, नंदिनी(कर्नाटक), वारणा, राजमंगल(इंदापूर), गिड्स(दौंड), हॉटसन आदींचे संकलन व विक्री सोलापुरात होते.--------------------विक्रेत्यांसाठी अच्छे दिन - शेतकºयांकडून २० रुपयांनी खरेदी केलेल्या दुधाची ग्राहकांना ४० ते ४४ रुपये लिटर दराने विक्री केले जाते. सोलापूर शहरात १२-१३ ब्रॅण्डचे पॅकिंग पिशवीतून दूध विक्री होते. दूध विक्रेत्याला पिशवीवर असलेल्या एम.आर.पी. पेक्षा कमी दराने शिवाय १० लिटरवर एक लिटर दूध मोफत दिले जाते. दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत असला तरी विक्रेत्याला मात्र चांगला पैसा मिळत आहे.
सोलापूर जिल्हा दुध संघातील ११६ कर्मचाºयांची स्वेच्छानिवृत्ती तरीही २०० कर्मचारी अतिरिक्तच, आव्हान पेलण्याकडे केलेले दुर्लक्षच दूध संघ अडचणीचे कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:37 AM
झपाट्याने होणाºया प्रगतीमुळे बेसुमार झालेली कर्मचारी भरती आज दूध संघाला हानिकारक ठरत असून, मागील वर्षभरात ११६ कर्मचारी कमी होऊनही अतिरिक्त २०० कर्मचाºयांचा भार संघाला सोसावा लागत आहे.
ठळक मुद्देसंकलन कमी झालेले असतानाही आहे त्या दुधाच्या विक्रीची व्यवस्थाही करण्याकडे पदाधिकारी व अधिकाºयांनी दुर्लक्ष पॅकिंग दूध विक्रीचे जाळे निर्माण करण्याऐवजी सुरू असलेल्या ठिकाणाचीही दूध विक्री बंद झालीशेतकºयांकडून २० रुपयांनी खरेदी केलेल्या दुधाची ग्राहकांना ४० ते ४४ रुपये लिटर दराने विक्री केले जाते